Join us

बजाज डॉमिनर ४०० ची अनोखी सफर, सर्वांत कठीण प्रवास पूर्ण करणारी एकमेव भारतीय बाइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:04 AM

ट्रान्स-सैबेरियन हा जगातील सर्वात कठीण मार्ग आहे. नदीकिनारा, वाळू, डोंगरी व दुर्गम प्रदेश, चिखल, खोल उतार, खडबडीत रस्ते यांनी भरलेला हा १५ हजार ६०० कि.मी.चा मार्ग ‘बजाज डॉमिनर ४००’ या बाइकने फक्त ५३ दिवसांत पूर्ण केला.

मुंबई : ट्रान्स-सैबेरियन हा जगातील सर्वात कठीण मार्ग आहे. नदीकिनारा, वाळू, डोंगरी व दुर्गम प्रदेश, चिखल, खोल उतार, खडबडीत रस्ते यांनी भरलेला हा १५ हजार ६०० कि.मी.चा मार्ग ‘बजाज डॉमिनर ४००’ या बाइकने फक्त ५३ दिवसांत पूर्ण केला. या प्रवासात तिन्ही बाइकर्सनी एक दिवसही विश्रांती घेतली नाही वा बाइकचे सुटे भाग बदलण्याची वा दुरुस्तीची गरज भासली नाही.बजाज डॉमिनर ४०० या ३७३.२ सीसी डीटीएसआय इंजिनाची क्षमता सिद्ध करणारी ही ओडिसी दीपक कामथ, सुधीर प्रसाद व दिलीप भट या बाइकर्सनी पूर्ण केली. त्यांनी उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान, रशिया, मंगोलिया व तेथून पुन्हा रशिया, अशा सहा देशांत हा प्रवास केला. या मार्गाचा काही भाग हा ४५ अंशापर्यंत झुकलेला होता. तोही बाइकने यशस्वीरीत्या पूर्ण केला.बाइकच्या या कामगिरीबाबत बजाजच्या मोटारसायकल बिझनेसचे अध्यक्ष एरिक वास म्हणाले की, डॉमिनर ४०० ने उन्हाळ्यात तीन महिने लेह-लडाखमध्ये रायडिंग करून भारतात एक मापदंड निर्माण केला होता. त्यानंतर आता ट्रान्स-सैबेरियनद्वारे डॉमिनारचे उत्कृष्ट डिझाईन, दर्जा व तंत्रज्ञानाला पोचपावतीच मिळाली आहे.

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइल