Join us

थर्ड पार्टी apps विसरा; आता टेलिकॉम कंपन्याच देणार कॉल करणाऱ्याची माहिती, TRAI चे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 10:09 PM

सध्या स्मार्टफोन युजर कॉल करणाऱ्याची माहिती मिळवण्यासाठी 'ट्रू कॉलर' सारख्या अॅप्सची मदत घेतात.

Unknown Number Calling : तुमच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला, तर तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे कॉल करणारा कोण आहे? तुमच्याकडे कॉलर आयडीवाले एखादे थर्ड पार्टी अॅप असेल, जर तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव दिसेल. पण, तुमच्याकडे ते अॅप नसेल, तर मात्र त्या व्यक्तीचे नाव दिसत नाही. पण, आता यावर सरकारने तोडगा काढला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने देशभरातील दूरसंचार कंपन्यांना कॉलिंग नेम प्रेझेंटेशन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, आता तुम्हाला कॉल करणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीचे नाव तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसेल.

सध्या स्मार्टफोन युजर्स अनोळखी कॉलची माहिती मिळविण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स वापरतात. या अॅप्समध्ये 'ट्रू कॉलर' अॅप खुल फेमस आहे. पण, अशाप्रकारच्या अॅप्सना कॉन्टॅक्ट डिटेल्स, फोन गॅलरी, स्पीकर, कॅमेरा आणि स्टोरेजचा अॅक्सेस द्यावा लागतो. या सगळ्यांना परवानगी दिल्याशिवाय ते थर्ड पार्टी ॲप काम करत नाहीत. पण, या परवानग्या दिल्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती असते.

कॉलिंग नेम प्रेझेंटेशनची चाचणी सुरू TRAI ने देशभरातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचर आणण्याचे निर्देश दिले आहेत. देशात मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी त्याची चाचणी सुरू केली आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार, ही चाचणी यशस्वी झाल्यास कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचर देशभरात लागू केले जाईल. त्यानंतर अनोळखी नंबरची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची गरज भासणार नाही.

या राज्यात चाचणी सुरू TRAI ने कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचरची चाचणी घेण्यासाठी देशातील सर्वात लहान मंडळाची निवड केली आहे. लवकरच सर्व कंपन्या हरियाणामध्ये कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचरची चाचणी सुरू करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायच्या सूचनेनुसार याच महिन्यात चाचणी सुरू होऊ शकते.

टॅग्स :स्मार्टफोनतंत्रज्ञानव्यवसाय