Join us

असुरक्षित कर्जांना वेसण बँक व्यवस्थेच्या हिताची

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 5:34 AM

रिझर्व्ह बँकेकडून नव्या नियमांचे समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काही असुरक्षित कर्जांचे नियम कडक करण्याचा अलीकडे घेण्यात आलेला निर्णय बँक व्यवस्थेसाठी हितकारकच आहे, असे प्रतिपादन  भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी केले.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आणि भारतीय बँक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक कार्यक्रमात दास यांनी सांगितले की, छोट्या व्यावसायिकांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जांना आम्ही नव्या नियमांपासून बाजूला ठेवले आहे. वृद्धीच्या पार्श्वभूमीवर त्यांना होत असलेला लाभ कायम ठेवणे आवश्यक आहे. आम्ही या उपाययोजना विचारपूर्वक केल्या आहेत. खबरदारी म्हणून हे उपाय योजण्यात आल्या आहेत. त्यामागे निश्चित लक्ष्य आहे. 

सतर्क राहणे गरजेचेnदास यांनी म्हटले की, सध्या बँकांत कोणताही नवा दबाव उत्पन्न होताना दिसत नाही. तरीही बँकांनी सतर्क राहायला हवे. nकाही बिगर-बँक वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्त संस्था उच्च व्याजाचे संकेत देत आहेत. त्यांनी व्याजदर विवेकपूर्ण पद्धतीने निर्धारित करायला हवेत. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास