मुंबई : इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी उत्पादन क्षेत्रातील भारतातील प्रमुख अग्रगण्य असणाऱ्या व्ही-गार्डने सर्वोत्तम दर्जाच्या बीएलडीसी श्रेणीतील ‘इनसाइट-जी’ या वेगवान क्षमतेच्या पंख्याचे अनावरण केले.
‘इनसाइट-जी’ बीएलडीसी श्रेणीतील पंखे हे सौंदर्यशास्त्र व कार्यक्षमतेचे एक उत्तम मिश्रण आहे. हे पंखे आकर्षक असून, १२ विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांच्या घराच्या अंतर्गत सजावटीची हे रंग शोभा वाढवतात. पंख्यांवर ५ वर्षांची वाॅरंटी आहे.
‘इनसाइट-जी’ श्रेणीतील पंख्याचा वेगही जाेरदार आहे. एका मिनिटाला ३७० राेटेशन्स एवढा वेग असून, खाेलीतील प्रत्येक काेपऱ्यापर्यंत हवा पाेहाेचते. तसेच प्रभावी धूळराेधक कोटिंग, हिवाळ्यात रिव्हर्स मोड ऑपरेशन, अत्याधुनिक
इंटरफेस आणि टायमर पर्यायांसह बहुउपयोगी रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे. फॅन बूस्ट मोड, ब्रीझ मोड, स्लीप मोड, स्टँडर्ड मोड आणि कस्टम मोड यासह ऑपरेशनचे अनेक मोड प्रदान करतो. पंख्याचे उद्योग क्षेत्र अंदाजे १२ हजार काेटी रुपये एवढी पंख्यांच्या क्षेत्रात वार्षिक उलाढाल हाेते. हे क्षेत्र दरवर्षी सुमारे ८ ते ९ टक्क्यांनी वाढत आहे. (वा. प्र.)
विजेची हाेणार बचत
‘इनसाइट जी’ हा पंखा केवळ ३५ वॅट्स एवढी उर्जा वापरताे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिलात बचत करणे शक्य आहे. स्टार रेटिंगनुसार या पंख्यांना ५ स्टार एवढे वीज बचतीचे रेटिंग मिळाले आहे.