नवी दिल्ली - वाढत्या थकीत कर्जामुळे (एनपीए) देशातील मोठ्या बँका अडचणीत सापडल्या आहेत. बँकांचा एनपीए केंद्र सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या एनपीएबाबत मोठे विधान केले आहे. बँकांच्या एनपीएसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार जबाबदार असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.
संसदेतील एका समितीकडे पाठवलेल्या उत्तरामध्ये रघुराम राजन म्हणाले की, घोटाळ्यांची चौकशी आणि यूपीए सरकारच्या धोरण लकव्यामुळे बँकांचे बुडीत कर्ज वाढत गेले. राजन यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या एनपीएसाठी काँग्रेसकडून मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र राजन यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला आयते कोलीत मिळणार आहे.
संसदेच्या अंदाज समितीने रघुराम राजन यांना बँकांच्या बुडीत कर्जाबाबत स्थिती स्पष्ट करण्यास सांगितले होते. 2006 पूर्वी पायाभूत विकासाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर होते. अशा परिस्थितीत बँकांनी बड्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले. कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये एसबीआय कॅप्स आणि आयडीबीआय बँक यासारख्या बँका आघाडीवर होत्या. असे राजन यांनी सांगितले.
बँकांच्या बुडीत कर्जासाठी यूपीए सरकार जबाबदार - रघुराम राजन
वाढत्या थकीत कर्जामुळे (एनपीए) देशातील मोठ्या बँका अडचणीत सापडल्या आहेत. बँकांचा एनपीए केंद्र सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या एनपीएबाबत मोठे विधान केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 09:48 PM2018-09-10T21:48:58+5:302018-09-10T21:49:23+5:30