नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) आजची जी आर्थिक परिस्थिती आहे तिला या आधीचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (संपुआ) सरकार जबाबदार आहे, असा ठपका सरकारने ठेवला. २००४ मध्ये भाजपकडून काँग्रेस आघाडीकडे सत्तेची सूत्रे गेली त्यावेळी १० हजार कोटी रुपयांचा नफा बीएसएनएलला होता. आज मात्र त्याला ८ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, असे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. बीएसएनएलची गेल्या १० वर्षांत जी अवस्था झाली व त्याला तोटा झाला याची चर्चा काँग्रेससोबत करावी लागेल. बीएसएनएलची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार सगळे प्रयत्न करु.
‘बीएसएनएल बिघडण्यास संपुआ जबाबदार’
सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) आजची जी आर्थिक परिस्थिती आहे तिला या आधीचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (संपुआ) सरकार जबाबदार आहे, असा ठपका
By admin | Published: August 13, 2015 01:32 AM2015-08-13T01:32:06+5:302015-08-13T01:32:06+5:30