Lokmat Money > बिझनेस न्यूज > Upcoming IPO : LIC सह 'या' 6 कंपन्या देतायेत बाजारात बंपर कमाईची संधी, जाणून घ्या कधी गुंतवावे लागणार पैसे!

Upcoming IPO : LIC सह 'या' 6 कंपन्या देतायेत बाजारात बंपर कमाईची संधी, जाणून घ्या कधी गुंतवावे लागणार पैसे!

Upcoming IPO : एलआयसीसह अनेक मोठ्या कंपन्या या वर्षी त्यांचा आयपीओ बाजारात आणू शकतात. दरम्यान, गुंतवणूकदार दीर्घकाळापासून एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:10 PM2022-03-02T15:10:36+5:302022-03-02T15:11:50+5:30

Upcoming IPO : एलआयसीसह अनेक मोठ्या कंपन्या या वर्षी त्यांचा आयपीओ बाजारात आणू शकतात. दरम्यान, गुंतवणूकदार दीर्घकाळापासून एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत.

Upcoming IPO: 6 companies with LIC offer bumper earning opportunities in the market, find out when to invest money! | Upcoming IPO : LIC सह 'या' 6 कंपन्या देतायेत बाजारात बंपर कमाईची संधी, जाणून घ्या कधी गुंतवावे लागणार पैसे!

Upcoming IPO : LIC सह 'या' 6 कंपन्या देतायेत बाजारात बंपर कमाईची संधी, जाणून घ्या कधी गुंतवावे लागणार पैसे!

नवी दिल्ली : 2021 मध्ये  आयपीओने (IPO) अनेक गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जर तुमची गेल्या वर्षीची बंपर कमाईची संधी चुकली असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. 2022 मध्येही शेअर बाजार तुम्हाला बाजारातून कमाई करण्याची संधी देत ​​आहे. एलआयसीसह अनेक मोठ्या कंपन्या या वर्षी त्यांचा आयपीओ बाजारात आणू शकतात. दरम्यान, गुंतवणूकदार दीर्घकाळापासून एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत.

एलआयसी आयपीओ (LIC IPO)
गुंतवणूकदार दीर्घकाळापासून एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत आहेत. सध्या आयपीओच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, पण असे मानले जाते की, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कंपनी आयपीओला सबस्क्रिप्शनसाठी ओपन करू शकते. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 75000 कोटी रुपये उभारू शकते.

फार्मइजी आयपीओ (PharmEasy IPO) 
फार्मास्युटिकल डिलिव्हरी अॅप कंपनी लवकरच आपला आयपीओ आणण्याचा विचार करत आहे. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये आयपीओसाठी कागदपत्रे सादर केली होती. या आयपीओ द्वारे कंपनी सुमारे 6,250 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.

डेल्लीव्हरी आयपीओ (Delhivery IPo) 
डेल्लीव्हरी या वर्षी बाजारात आयपीओ आणण्याची योजना आखत आहे, ज्याद्वारे कंपनीने 7460 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. असे मानले जात आहे की कंपनी मार्च महिन्यातच आयपीओ लाँच करू शकते. यामध्ये सुमारे 5000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील.

बिकाजी फूड्स आयपीओ (Bikaji foods IPO)
याशिवाय बिकाजी फूड्स इंटरनॅशनलने 1000 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रेही सादर केली आहेत.

बायजूस आयपीओ (Byju's IPO)
बायजूस ही ऑनलाइन शिक्षण सुविधा देणारी कंपनी शेअर बाजारातही आयपीओ आणू शकते. कंपनीने आयपीओ लॉन्च करण्याची योजना आखली आहे. कंपनीची योजना सुमारे 40 कोटी डॉलर ते 60 कोटी डॉलर उभारण्याची आहे.

ओयो होटल अँड होम्स आयपीओ (OYO Hotels and Homes)
ओयो हॉटेल्स अँड  होम्स देखील गुंतवणूकदारांना कमाईची संधी देण्याचा विचार करत आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून सुमारे 8,430 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. यामध्ये सुमारे 7000 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू जारी केले जातील.

Web Title: Upcoming IPO: 6 companies with LIC offer bumper earning opportunities in the market, find out when to invest money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.