Lokmat Money > बिझनेस न्यूज > Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स

Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स

रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 28 कंपन्यांना आयपीओ लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 03:11 PM2024-01-06T15:11:52+5:302024-01-06T15:12:17+5:30

रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 28 कंपन्यांना आयपीओ लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील आठवड्यात 3 कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

Upcoming IPO: IPO of these three companies coming next week; Price is also low, see details | Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स

Upcoming IPO: पुढील आठवड्यात येणार 'या' तीन कंपन्यांचे IPO; किंमतही कमी, पाहा डिटेल्स

2023 हे वर्ष आयपीओच्या (IPO News Updates) दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरलं होतं. यावर्षीही अनेक कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. निवडणुकीपूर्वी गुंतवणूकदार खूप व्यस्त राहण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, 28 कंपन्यांना आयपीओ लॉन्च करण्याची परवानगी मिळाली आहे. या कंपन्या मिळून एकूण 30,000 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, पुढील आठवड्यात 3 कंपन्यांचा आयपीओ येत आहे.

ज्योती सीएनसी (Jyoti CNC IPO)

9 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत गुंतवणूकदार या आयपीओसाठी अर्ज करू शकतील. कंपनीनं आयपीओसाठी 315 रुपये ते 331 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. कंपनीच्या आयपीओचा आकार 1000 कोटी रुपये आहे. 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 15 कोटी रुपये होता. तर वर्षभरापूर्वी कंपनीला 48 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

आयबीएल फायनान्स (IBL Finance IPO)

या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना 9 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी असेल. कंपनीनं आयपीओची किंमत 51 रुपये ठेवली आहे. कंपनीनं 2000 शेअर्सचा एक लॉट तयार केलाय. हा इश्यू पूर्णपणे ताज्या इक्विटीवर आधारित असेल. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 34.3 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.

न्यू स्वान  (New Swan IPO)

हा IPO 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान खुला असेल. कंपनीनं आयपीओसाठी 62 ते 66 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. या आयपीओची इश्यू साईज 33 कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओद्वारे 50.16 लाख फ्रेश शेअर जारी करेल. कंपनी IPO मधून उभे केलेले पैसे कर्ज फेडण्यासारख्या कामांसाठी वापरेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Upcoming IPO: IPO of these three companies coming next week; Price is also low, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.