Sanstar IPO :शेअर बाजारात दररोज नवनवीन कंपन्या लिस्ट/रजिस्टर होत आहेत. आता या यादीत फ्डू, अॅनिमल आणि औद्योगिक वापरासाठी विशेष उत्पादने बनवणाऱ्या Sanstar कंपनीचेही नाव सामील होणार आहे. कंपनीने लवकरच शेअर बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी सुमारे 510.15 कोटी रुपयांचा IPO आणण्याची तयारी केली आहे. याचे सब्सक्रिप्शन येत्या 19 जुलै रोजी सुरू होईल आणि 23 जुलैपर्यंत तुम्ही त्यात पैसे गुंतवू शकाल. कंपनीने IPO साठी किंमत 90 ते 95 रुपयांपर्यंत ठेवली आहे. या IPO मध्ये नवीन इश्यूसह ऑफर फॉर सेल असेल.
कंपनीचे प्रमोटर्स आपला हिस्सा विकणार
कंपनीने SEBI ला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, IPO मध्ये 397.10 कोटी रुपयांचा नवीन इश्यू असेल आणि 11,900,000 इक्विटी शेअर्स, ऑफर फॉर सेलद्वारे जारी केले जातील. या IPO च्या माध्यमातून राणी गौतम चंद चौधरी 38 लाख शेअर्स, ऋचा संभाव चौधरी आणि समिक्षा श्रेयांश चौधरी 33 लाख शेअर्स, गौतम चंद सोहनलाल चौधरी, सम्भव चौधरी आणि श्रेयांश चौधरी प्रत्येकी 5 लाख शेअर्स विकणार आहेत.
प्लांटचा विस्तार आणि कर्जाची परतफेड केली जाणार
कंपनीने क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) साठी 50 टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के राखीव ठेवले आहेत. याशिवाय 153 कोटी रुपयांचे शेअर्स 18 जुलै रोजी उघडणाऱ्या अँकर बुकमध्ये ठेवण्यात आले आहेत. कंपनी आपल्या धुळे प्लांटचा विस्तार करण्यासाठी IPO मधून रु. 181.6 कोटी वापरणार आहे. याशिवाय 100 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात येणार आहे. कंपनीवर सध्या 164.23 कोटी रुपयांचे कर्ज आहे. उर्वरित पैसे कॉर्पोरेट कारणांसाठी वापरले जातील.
कंपनीची 49 देशांमध्ये उत्पादने
Sanstar कडे विशेष वनस्पती आधारित उत्पादने तयार करण्याचे कौशल्य आहे. यामध्ये लिक्विड ग्लुकोज, ड्राय ग्लुकोज, माल्टोडेक्सट्रिन पावडर, डेक्सट्रोज मोनोहायड्रेट, टेबल स्टार्च, जर्म्स, ग्लूटेन, फायबर आणि एनरिच्ड प्रोटीनचा समावेश आहे. ही देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी मानली जाते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा निर्यातीतून महसूल 394.44 कोटी रुपये होता. कंपनी आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, अमेरिका, युरोप आणि ओशनियामधील 49 देशांना आपली उत्पादने पुरवते.
(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)