Lokmat Money > बिझनेस न्यूज > लागा तयारीला...या आठवड्यात येणार 4 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या डिटेल्स...

लागा तयारीला...या आठवड्यात येणार 4 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या डिटेल्स...

Upcoming IPO List : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 08:05 PM2023-09-03T20:05:37+5:302023-09-03T20:06:12+5:30

Upcoming IPO List : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

Upcoming IPO List: Get ready...IPO of 4 companies coming this week, know the details | लागा तयारीला...या आठवड्यात येणार 4 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या डिटेल्स...

लागा तयारीला...या आठवड्यात येणार 4 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या डिटेल्स...

Upcoming IPO List :शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंवा नवीन IPO ची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या आठवड्यात एक-दोन नव्हे तर चार-चार IPO तुम्हाला कमाईची उत्तम संधी देणार आहेत. तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे. या आठवड्यात चार कंपन्या आपली आयपीओ लॉन्च करणार आहे.

पहिला IPO
आगामी IPO च्या यादीतील पहिले नाव रत्नवीर प्रिसिजन इंजिनियरिंग लिमिटेडच्या IPO चे आहे. सोमवार, 4 सप्टेंबर 2023 रोजी हा आयपीओ लॉन्च होणार आहे. गुंतवणूकदार 6 सप्टेंबरपर्यंत या IPO मध्ये पैसे गुंतवू शकतात. 165.03 कोटी रुपयांच्या इश्यू अंतर्गत 13,800,000 शेअर्स विकले जाणार आहेत. रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेडने या IPO ची किंमत 93 रुपये ते 98 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. 

दुसरा IPO
दुसरा आयपीओओ ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स, ही आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित कंपनी आणणार आहे. या कंपनीचा आयपीओ 6 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होईल आणि इच्छुक गुंतवणूकदार तीन दिवसांसाठी, म्हणजेच 8 सप्टेंबरपर्यंत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतील. याद्वारे, कंपनी 11,824,163 शेअर्सची विक्री करणार असून त्यासाठीची किंमत 695 ते 735 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. 

तिसरा IPO
6 सप्टेंबर 2023 रोजीच कहान पॅकेजिंग लिमिटेडचा आयपीओ लॉन्च होणार आहे. 6 सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडल्यानंतर, IPO 8 सप्टेंबरपर्यंत सबस्क्राइब करता येईल. या अंतर्गत कंपनी 720,000 शेअर्स ऑफर करणार असून बाजारातून 5.76 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कहान पॅकेजिंग शेअर्सच्या वाटपाची तारीख 13 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

चौथा IPO
या आठवड्यात येणार्‍या चौथ्या आणि शेवटच्या IPO सीवेज इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारी कंपनी EMS लिमिटेडचा आहे. EMS Limited IPO 8 सप्टेंबर 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी सुरू होईल आणि गुंतवणूकदार 12 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतील. कंपनीने याद्वारे बाजारातून 321.24 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. 

Web Title: Upcoming IPO List: Get ready...IPO of 4 companies coming this week, know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.