Lokmat Money > बिझनेस न्यूज > Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! आठवड्याभरात येताहेत ३ IPO; ६५ टक्क्यांपार गेलाय ग्रे मार्केट प्रीमिअम

Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! आठवड्याभरात येताहेत ३ IPO; ६५ टक्क्यांपार गेलाय ग्रे मार्केट प्रीमिअम

आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक सुवर्णसंधी आहे. पुढील १० दिवसांत एक दोन नाहीतर ३ आयपीओ येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 04:15 PM2023-05-15T16:15:27+5:302023-05-15T16:16:18+5:30

आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक सुवर्णसंधी आहे. पुढील १० दिवसांत एक दोन नाहीतर ३ आयपीओ येणार आहेत.

Upcoming IPOs Keep Money Ready 3 IPOs coming in a week Gray market premium has crossed 65 percent Krishca Strapping Remus Pharma Crayons Advertising nse | Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! आठवड्याभरात येताहेत ३ IPO; ६५ टक्क्यांपार गेलाय ग्रे मार्केट प्रीमिअम

Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! आठवड्याभरात येताहेत ३ IPO; ६५ टक्क्यांपार गेलाय ग्रे मार्केट प्रीमिअम

आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक सुवर्णसंधी आहे. पुढील १० दिवसांत एक दोन नाहीतर ३ आयपीओ येणार आहेत. नुकत्याच आलेल्या मॅनकाइंड फार्माला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता आयपीओ बाजारात येण्यास तयार आहेत. जे आयपीओ बाजारात येणार आहे, त्याबद्दलही गुंतवणूकदारांमध्ये क्रेझ दिसून येतेय. उद्या म्हणजेच मंगळवारी, बुधवारी आणि पुढील सोमवारी इश्यू ओपन होणार आहे. Krishca Strapping, Remus Pharma आणि Crayons Advertising चे इश्यू मेनबोर्ड म्हणजेच एनएसई-बीएसईवर लिस्ट होण्यासाठी ओपन होणार नाहीत. या शेअर्सचं लिस्टिंग एनएसई-एसएमईवर होणार आहे.

यापैकी एका शेअरची ग्रे मार्केटमध्ये कोणतीही हालचाल दिसत नाही. परंतु अन्य दोन आयपीओंचा ग्रे मार्केट प्रीमिअम ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचलाय. दरम्यान, तज्ज्ञांनुसार कंपनीच्या कोणत्याही इश्यूमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी त्याच्या ग्रे मार्केट प्रीमिअममधून मिळालेल्या संकेतांऐवजी कंपनीच्या फायनॅन्शिअल आणि फंडामेंटल्सच्या आधारे निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय.

Krishca Strapping

स्ट्रॅपिंग टूल्स आणि स्ट्रॅपिंग सिल तयार करून विक्री करणारी दिग्गजकंपनी Krishca Strapping Solution चा १८ कोटींचा आयपीओ १६ मे रोजी खुला होणार आहे. या इश्यूमध्ये ५१ ते ५४ रुपयांच्या प्राईज बँड आणि २००० हजार शेअर्सच्या लॉटसाठी तुम्हाला ३३.२० लाख नवे शेअर्स जारी केले जातील. याची अलॉटमेंट २४ मे आणि लिस्टिंग २९ मे ला होणार आहे. याचं जीएमपी ६५ टक्के प्रीमिअमवर आहे.

Remus Pharma

औषधांचं मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या या कंपनीचा ४८ कोटींचा आयपीओ १७ ते १९ मे दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला राहणार आहे. या अंतर्गत ३.८८ लाख नवे शेअर्स जारी केले जातील. याचा लॉट १०० शेअर्सचा असून यासाठी ११५० ते १२२९ रुपयांचा प्राईज बँड निश्चित करण्यात आलाय. या शेअरची अलॉटमेंट २४ मे आणि लिस्टिंग २९ मे रोजी होईल. याचा ग्रे मार्केट प्रीमिअम ९ टक्के अपसाईड आहे.

Crayons Advertising

इंटिग्रेटेड मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स एजन्सीचा आयपीओ पुढील आठवड्यात २२ ते २५ मेदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. याअंतर्गत ६४.३० लाख नवे इक्विटी शेअर्स जारी होतील. यासाठी शेअर्सचा प्राईज बँड आणि लॉट साईज अद्याप ठरवण्यात आलेला नाही. या कंपनीच्या शेअर्सची अलॉटमेंट ३० मे रोजी आणि लिस्टिंग २ जून रोजी होईल.

(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Upcoming IPOs Keep Money Ready 3 IPOs coming in a week Gray market premium has crossed 65 percent Krishca Strapping Remus Pharma Crayons Advertising nse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.