Lokmat Money > बिझनेस न्यूज > १४ डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करा Aadhaar Card, घरबसल्या ऑनलाइन होतील 'ही' कामं

१४ डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करा Aadhaar Card, घरबसल्या ऑनलाइन होतील 'ही' कामं

जर तुम्हाला १४ डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करायचं असेल तर तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावं लागणार नाही. पाहा कोणती माहिती अपडेट करता येणार.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 08:46 AM2023-12-02T08:46:47+5:302023-12-02T08:49:13+5:30

जर तुम्हाला १४ डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करायचं असेल तर तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावं लागणार नाही. पाहा कोणती माहिती अपडेट करता येणार.

Update Aadhaar Card for free till 14th December demographic changes mobile no email change done online from home | १४ डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करा Aadhaar Card, घरबसल्या ऑनलाइन होतील 'ही' कामं

१४ डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करा Aadhaar Card, घरबसल्या ऑनलाइन होतील 'ही' कामं

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (Unique Identification Authority of India) स्टँडर्ड फी काढून टाकली आहे. जर तुम्हाला १४ डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करायचं असेल तर तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावं लागणार नाही. या काळात नागरिकांना मोफत त्यांची डेमोग्राफीक माहिती, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक आणि ईमेल दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे आणि यासाठी त्यांना कोणतंही वेगळं शुल्क भरावं लागणार नाही.

तर, आधारमधील सर्व डेमोग्रफीक माहिती अपडेट करणं पूर्णपणे विनामूल्य आहे आणि तुम्ही ते घरी बसून ऑनलाइन करू शकता. दरम्या, जर एखाद्याला फोटो, iris किंवा इतर बायोमेट्रिक तपशील अपडेट करायचे असतील, तर त्याला आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल आणि त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं शुल्कही भरावं लागेल. बायोमेट्रिक अपडेटसाठी विशेष उपकरणांची आवश्यकता असते आणि ते फक्त नोंदणी केंद्रांवर उपलब्ध असतात. त्या ठिकाणी त्या उपकरणांच्या मदतीनं बोटांचे ठसे स्कॅन केले जातात.

१० वर्षांनी अपडेट अनिवार्य
फसवणूक टाळण्यासाठी, बायोमेट्रिक अपडेट प्रक्रियेकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. UIDAI ने दर १० वर्षांनी आधार कार्डाची माहिती अपडेट करणं अनिवार्य केलं आहे. तुमची माहिती योग्य आणि अपडेटेड आहे याची देखील तुम्हाला खात्री करणं आवश्यक आहे.

आधारद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी अपडेट्सही आवश्यक आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास तुम्हाला पत्ता बदलावा लागेल. तुम्ही ही माहिती UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून अपडेट करू शकता. दरम्यान, मोफत अपडेटची तारीख देखील १४ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Web Title: Update Aadhaar Card for free till 14th December demographic changes mobile no email change done online from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.