Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता फुकटात करा ‘आधार कार्ड’ अपडेट; आधी किती शुल्क आकारले जात होते?

आता फुकटात करा ‘आधार कार्ड’ अपडेट; आधी किती शुल्क आकारले जात होते?

आधार कार्ड हे भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:19 AM2023-03-17T10:19:05+5:302023-03-17T10:19:27+5:30

आधार कार्ड हे भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

update aadhaar card now for free how much was charged earlier | आता फुकटात करा ‘आधार कार्ड’ अपडेट; आधी किती शुल्क आकारले जात होते?

आता फुकटात करा ‘आधार कार्ड’ अपडेट; आधी किती शुल्क आकारले जात होते?

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :आधार कार्ड हे भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने आधार कार्डबाबत काही महिन्यांपूर्वी महत्त्वाची सूचना केली हाेती. ज्यांनी १० वर्षांपूर्वी आधार नाेंदणी केली आहे आणि त्यात एकदाही बदल केलेला नाही, त्यांनी आधारमधील माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने एक दिलासा दिला आहे. आधारमधील माहिती आता माेफत हाेणार आहे. १४ जून २०२३ पर्यंत सरकारने हा दिलासा दिला आहे. 

आधार प्राधिकरण अर्थात ‘युआयडीएआय’ने ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यानुसार, १४ जूनपर्यंत आधार डाक्युमेंट अपडेट करण्याची सुविधा माेफत केली आहे. हा बदल डिजिटल इंडिया माेहिमेंतर्गत करण्यात येत आहे. ‘आधार’ १० वर्षांपूर्वी काढले असून त्यात कधीही अपडेट केली नसल्यास ओळखपत्र आणि रहिवासाचा पुरावा अपलाेड करणे आवश्यक आहे. अन्यथा सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागेल.

आधी हाेते ५० रुपये शुल्क

‘आधार’ अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येत हाेते. मात्र, १० वर्षांमध्ये एकदाही ‘आधार’ अपडेट झाले नसल्यास आता माेफत कागदपत्रे अपलाेड करून अपडेट करता येणार आहे. नाव, पत्ता किंवा जन्म तारखेत बदल करायच असल्यास नियमित शुल्क द्यावे लागेल. माेफत अपडेट करण्याची सुविधा केवळ माय आधार पाेर्टलवर आहे. ‘आधार’ केंद्रांवर ५० रुपये शुल्क द्यावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: update aadhaar card now for free how much was charged earlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.