नवी दिल्ली: तुम्ही नोकरदार व्यक्ती असाल तर EPF (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खात्याविषयी तुम्हाला माहिती असेलच. या EPF अकाउंटमध्ये नॉमिनी अपडेट करणे आवश्यक आहे. त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. EPF आणि EPS (कर्मचारी पेन्शन योजना) च्या बाबतीत नामांकन आवश्यक आहे, जेणेकरून EPFO सदस्याच्या अकाली मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला हा निधी वेळेत उपलब्ध करुन देता येईल. नॉमिनी दाखल करेपर्यंत तुम्हाला सेवानिवृत्ती वेतनही मिळू शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला नॉमिनी कसे अपडेट करायचे आणि कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती देणार आहोत.
ऑनलाईन करा नॉमिनी फाईल
EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने आपल्या सदस्य कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशनची सुविधा दिली आहे. म्हणजेच ईपीएफ खातेधारक घरी बसून डिजिटल पद्धतीने नॉमिनी अॅड करू शकतात. ज्या सदस्यांचे UAN सुरू आहे आणि मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला आहे, अशाच सदस्यांना ई-नामांकनाची सुविधा मिळू शकते. ईपीएफ नामांकन ईपीएससाठीदेखील वैध आहे.
ईपीएफ/ईपीएसमध्ये ई-नामांकन कसे करावे?
- EPFO च्या वेबसाइटवर जा आणि 'सर्विसेज' विभागात 'फॉर एंप्लॉइज'वर क्लिक करा.
- आता 'मेंबर UAN/ऑनलाइन सेवा (OCS/OTCP)' वर क्लिक करा.
- UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- मॅनेज टॅबमध्ये 'ई-नामांकन' निवडा.
- यानंतर स्क्रीनवर 'प्रोवाइड डिटेल्स' टॅब दिसेल, 'सेव्ह' वर क्लिक करा.
- कुटुंब घोषणा अद्यतनित करण्यासाठी 'येस'वर क्लिक करा.
- आता 'Add Family Details' वर क्लिक करा.
- तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील अॅड करू शकता.
- नामनिर्देशित व्यक्तीचा वाटा किती असेल हे जाहीर करण्यासाठी 'नामांकन तपशील' वर क्लिक करा.
- तपशील अॅड केल्यानंतर 'सेव्ह ईपीएफ नामांकन' वर क्लिक करा.
- OTP जनरेट करण्यासाठी 'ई-साइन' वर क्लिक करा.
- आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल,
- ओटीपी विहित जागेत टाकून सबमिट करा.
- त्यानंतर ई-नॉमिनेशनची ईपीएफओकडे नोंदणी केली जाईल.
नामांकनासाठी ही कागदपत्रे आवश्यक
EPFO वर नामांकन दाखल करण्यासाठी, तुम्हाला किमान दोन लोकांच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. एक तुमच्यासाठी आणि दुसरा ज्यांना तुम्ही नॉमिनी बनवत आहात. यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (100 KB पेक्षा कमी) आणि अॅड्रेस प्रुफ आवश्यक असेल. दुसरीकडे, नॉमिनीचे आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (100 KB पेक्षा कमी) आवश्यक असेल.