नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये (EPFO) बँक डिटेल्सची मोठी भूमिका असते. तुमचे बँक डिटेल्स अपडेट केले पाहिजेत जेणेकरून पैशांच्या व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. ईपीएफओच्या सदस्याला युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN मिळतो, जो कधीही बदलत नाही. नोकरी आणि कंपनी बदलली तरी हा UAN बदलत नाही तर एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. हा नंबर संपूर्ण कामात कर्मचाऱ्याशी संबंधित असतो. आता या नंबरद्वारे तुम्ही ईपीएफओमध्ये बँक डिटेल्स देखील अपडेट करू शकता.
सध्या संपूर्ण व्यवस्था डिजिटल आणि ऑनलाइन होत आहे. त्यामुळे ईपीएफओ सुद्धा आपल्या सदस्यांसाठी ऑनलाइनच्या सुविधा देत आहेत. ईपीएफओने आपल्या सर्व सदस्यांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची सुविधा दिली आहे. ज्या सदस्यांकडे UAN क्रमांक आहे ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, असेही काही लोक असू शकतात ज्यांनी यापूर्वी ईपीएफओचा फायदा घेतला आहे आणि त्यांचा UAN नंबर देखील आहे. मात्र, तो नंबर रिकव्हर करू शकला नाही तर ते ऑनलाइन अपडेटचा लाभ घेऊ शकत नाहीत.
UAN चे मोठे फायदेUAN चे अनेक फायदे आहेत. ईपीएफओ सदस्य या युनिक नंबरद्वारे पेन्शन फंडाचे डिटेल्स एकाच ठिकाणी पाहू शकतात, पीएफ खात्यातील सर्व व्यवहारांची माहिती मिळवू शकतात, ईपीएफओमध्ये दिलेले बँक डिटेल्स देखील अपडेट करू शकतात. याचा अर्थ असा की ईपीएफओ सदस्य सहजपणे बँकेचे डिटेल्स बदलू शकतात आणि हे काम घरी बसून ऑनलाइन होऊ शकते.
तुमच्या पीएफ खात्यासाठी बँक डिटेल्स ऑनलाइन अपडेट करण्यासाठी काय करावे?- ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमचे डिटेल टाकून लॉग इन करा.- टॉप मेनूवरील 'Manage' टॅबवर क्लिक करा.- ड्रॉप डाउन मेनूमधून 'KYC' पर्यायावर जा आणि दस्तऐवज प्रकारात 'Bank' निवडा.- बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडसह नवीन बँक तपशील प्रविष्ट करा.- अपडेट बँक तपशील प्रविष्ट करण्यासाठी 'Save' वर क्लिक करा. नंतर तपशील KYC पेंडिंग अप्रुव्हल सेक्शनद्वारे दिसून येईल.- आवश्यक कागदपत्रे तुमच्या नियोक्त्याकडे (ज्या कंपनीसाठी तुम्ही काम करता) सबमिट करा. लक्षात ठेवा, SBI ग्राहकांसाठी, बँक फक्त डिजिटल माध्यमातून पडताळणी करेल.- केवायसी पडताळणी पूर्ण झाल्यावर, तुमच्या विनंतीची स्थिती डिजिटली स्वीकारलेल्या केवायसीमध्ये अपडेट केली जाईल- नियोक्ता किंवा SBI द्वारे बँक तपशीलांची पुष्टी झाल्यानंतर EPFO एक कंफर्मेशन मेसेज पाठविला जाईल.