Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'आधार कार्ड'मध्ये मोबाइल नंबर अपडेट करायचाय?, कागदपत्रांची गरज नाही; जाणून घ्या...

'आधार कार्ड'मध्ये मोबाइल नंबर अपडेट करायचाय?, कागदपत्रांची गरज नाही; जाणून घ्या...

आधारकार्डशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी अपडेट असणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

By मोरेश्वर येरम | Published: December 18, 2020 02:16 PM2020-12-18T14:16:18+5:302020-12-18T14:21:51+5:30

आधारकार्डशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी अपडेट असणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

update mobile number in Aadhar Card No documents required | 'आधार कार्ड'मध्ये मोबाइल नंबर अपडेट करायचाय?, कागदपत्रांची गरज नाही; जाणून घ्या...

'आधार कार्ड'मध्ये मोबाइल नंबर अपडेट करायचाय?, कागदपत्रांची गरज नाही; जाणून घ्या...

नवी दिल्ली
बँक खातं उघडणं असो किंवा इतर कोणत्याही सेवांसाठी आधारकार्ड किती महत्वाचं आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. इतकंच काय तर मोबाइलचं सिमकार्ड खरेदी करायचं असेल तरी आधारकार्डची गरज लागते. 

आधारकार्डशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी अपडेट असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पण अनेकदा असं होतं की तुम्हाला नवं सिमकार्ड घ्यावं लागतं. त्यामुळे नवा मोबाइल क्रमांक बँक अकाऊंटसोबतच आधारकार्ड सोबतही लिंक करावा लागतो. 

'आधारकार्ड'शी संबंधित नियम
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधारकार्डच्या माध्यमातून १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक दिला आहे. यात मोबाइल क्रमांक, पत्ता, नाव, वैवाहिक स्थिती अशी सर्व माहिती तुम्हाला अपडेट करता येऊ शकते. माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र दाखवणं आवश्यक असतं. पण तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करायचा झाल्यास कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. 

'आधारकार्ड'मध्ये मोबाइल क्रमांक अपडेट करण्याची पद्धत...
1. UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊन तुमच्या नजिकच्या आधार केंद्राची माहिती मिळवा. 
2. आधार केंद्रामध्ये जाण्यासाठी तुमच्या सवडीनुसार अपॉइंटमेंट बुक करा
3. अपॉइंटमेंटनुसार निश्चित वेळेवर आधार केंद्रात पोहचा. 
4. आधार केंद्रावर दिला जाणारा Aadhaar Update Form भरा. 
5. मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची गरज नाही. 
6. फक्त फॉर्म भरुन आधार केंद्रावरील अधिकाऱ्याकडे द्या आणि निश्चित करण्यात आलेले शुल्क भरा. 
7. आधार केंद्रातील अधिकाऱ्याकडून तुम्हाला एक स्लिप दिली जाईल. त्यावर URN नंबर लिहिला असेल. या नंबरवरुन तुम्ही केलेल्या अर्जाच्या सध्याच्या स्थितीबाबत संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीनं पाहता येईल.
 

Web Title: update mobile number in Aadhar Card No documents required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.