नवी दिल्ली : यूआयडीएआयने आता नागरिकांना ही सुविधा दिली आहे की, ते आपल्या कुटुंब प्रमुखाच्या सहमतीने ऑनलाइन आधार कार्डच्या पत्त्यात अपडेट करू शकतील.यूआयडीएआयने मंगळवारी सांगितले की, कुटुंबातील प्रमुखांशी संबंध दाखविणारे दस्तऐवज जमा करून निवासस्थानाचा पत्ता ऑनलाइन अपडेट करता येऊ शकेल. या दस्तऐवजात रेशन कार्ड, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा मार्कशिट यांचा समावेश आहे. यात कुटुंबप्रमुख आणि ती व्यक्ती यांची दोघांची नावे असावीत. जर एखाद्या व्यक्तीकडे हे दस्तऐवज नसतील तर ते कुटुंब प्रमुखाकडून स्वयं घोषणापत्र घेऊन जमा करू शकतात. ही सुविधा मुले, पत्नी व आई-वडील अशा जवळच्या नातेवाइकांना उपयोगी ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, १८ वर्षांवरील अधिक वयाच्या कोणत्याही व्यक्तीला कुटुंबाचा प्रमुख मानले जाऊ शकते.
कुटुंब प्रमुखांच्या सहमतीने आधार कार्ड करा अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 10:54 AM