नवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला डिजिटल पेमेंट मोड म्हणून समोर आले आहे. डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय सारखी सुविधा तुम्हाला तुमच्या घरात बसून सहज पैसे ट्रान्सफर करू देते. यासाठी, तुम्हाला पेटीएम, फोनपे, भीम, गुगल पे इत्यादीसारख्या यूपीआय सपोर्टिंग अॅप्सची आवश्यकता होती. पण तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही तुमच्या फीचर फोनच्या मदतीने इंटरनेट न वापरता कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकता.
हजारो फीचर फोन युजर्संना डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडे यूपीआयची नवीन आवृत्ती यूपीआय 123 पे (UPI 123Pay) सादर केली आहे. UPI 123Pay सह, आता ज्या युजर्सकडे इंटरनेटसह स्मार्टफोन नाही, ते देखील यूपीआय ट्रांजेक्शन करू शकतील. या सुविधेद्वारे फीचर फोन युजर्स 4 प्रकारे यूपीआय ट्रांजेक्शन करू शकतात.
युजर्स इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR), अॅप बेस्ड पेमेंट, प्रॉक्सिमिटी साउंड बेस्ड पेमेंट आणि मिस्ड कॉलद्वारे पेमेंट करू शकतात. दरम्यान, आपण आता याठिकाणी आयव्हीआरद्वारे यूपीआय पेमेंटबद्दल माहिती घेऊया. विशेष म्हणजे या सुविधा सध्या फक्त काही बँकांच्या ग्राहकांसाठी सुरू आहे.
सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून आयव्हीआर नंबर 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 डायल करा. यूपीआय आयडी तयार करण्यासाठी आणि यूपीआय पिन तयार करण्यासाठी सूचनांचे पालन करावे लागेल.
IVR द्वारे UPI 123Pay चा वापर कसा करावा?- तुमच्या फोनद्वारे आयव्हीआर नंबर 080 4516 3666 / 6366 200 200 / 080 4516 3581 डायल करा. - आता तुमच्या आवडीची भाषा निवडा.- यानंतर यूपीआयला लिंक केलेली बँक निवडा.- व्हेरिफिकेशनसाठी 1 टाइप करा.- पैसे पाठवण्यासाठी 1 डायल करा.- ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचा मोबाईल नंबर इंटर करा.- डिटेल्सची पुष्टी करा.- आता पाठवायची रक्कम टाकू शकता.