Join us  

UPI: यापुढे करू शकणार यूपीआयद्वारे गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:29 AM

UPI News: वैयक्तिक गुंतवणूकदारांना समभाग, नवीन शेअर्स तसेच कर्जरोख्यांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक यूपीआयद्वारे करण्याला भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) मंजुरी दिली आहे. १ मेपासून ही नवीन व्यवस्था सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : वैयक्तिक गुंतवणूकदारांना समभाग, नवीन शेअर्स तसेच कर्जरोख्यांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक यूपीआयद्वारे करण्याला भारतीय प्रतिभूती नियंत्रण मंडळाने (सेबी) मंजुरी दिली आहे. १ मेपासून ही नवीन व्यवस्था सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्री तसेच समभाग व कर्जरोख्यांमध्ये यूपीआयच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याला सेबीने परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या गुंतवणुकीसाठीची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत ठरविण्यात आली आहे. या गुंतवणूकदारांना अर्जामध्ये यूपीआय आयडी द्यावा लागणार आहे. यासाठीचे अर्ज हे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, शेअर ब्रोकर व ट्रान्स्फर एजंट यांच्यामार्फत असे अर्ज दाखल करता येणार आहेत. १ मे तसेच त्यानंतर येणाऱ्या वेगवेगळ्या इश्यूंमध्ये या पद्धतीचा अवलंब करून गुंतवणूक करता येईल, असे सेबीने जाहीर केले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिसेंबर महिन्यामध्ये यूपीआयद्वारे करावयाच्या व्यवहारांची मर्यादा पाच लाख रुपये केली होती. त्याला अनुसरून हा बदल केला गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :पैसागुंतवणूक