Lokmat Money > बिझनेस न्यूज > यूपीआय व्यवहारांना 'अच्छे दिन', वार्षिक आधारावर १११ टक्क्यांची मोठी वाढ

यूपीआय व्यवहारांना 'अच्छे दिन', वार्षिक आधारावर १११ टक्क्यांची मोठी वाढ

गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:49 PM2022-05-03T12:49:15+5:302022-05-03T12:53:19+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.

UPI hits record high in April with 5 58 bn transactions worth Rs 9 83 trn increased more than 100 percent | यूपीआय व्यवहारांना 'अच्छे दिन', वार्षिक आधारावर १११ टक्क्यांची मोठी वाढ

यूपीआय व्यवहारांना 'अच्छे दिन', वार्षिक आधारावर १११ टक्क्यांची मोठी वाढ

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यामध्ये ५५८ कोटींचे यूपीआय  व्यवहार पार पडले असून, व्यवहारमूल्य १० लाख कोटींपर्यंत पोहोचले आहेत. 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ॲाफ इंडिया (एनपीसीआय)ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात एकूण व्यवहारांमध्ये ३.३ टक्के आणि मूल्याच्या आधारावर २.३६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. वार्षिक आधारावर यात १११ टक्के वाढ झाली आहे.

कोरोनाकाळात वाढ

  • २०१६ मध्ये यूपीआय सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर यात मोठी वाढ होत गेली आहे.  खासकरून कोरोनाकाळात यामध्ये मोठी वाढ झाली.  एनपीसीआयने यूपीआयला तयार केले. 
  • यासह रुपे, भारत बिल पे या माध्यमातूनही ॲानलाइन व्यवहार केले जातात. पुढील २ ते ३ वर्षांमध्ये प्रत्येक दिवसाला १०० कोटींचे यूपीआय व्यवहार करण्याचे एनपीसीआयचे लक्ष्य आहे.
     
          फेब्रुवारी                   ४५२कोटी     ८.२६ लाख कोटी 
            मार्च                 ५४० कोटी     ९.६० लाख कोटी 
           एप्रिल               ५५८कोटी     ९.८३ लाख कोटी 

फोन पेच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३९ लाख कोटींचे व्यवहार पार पडले. तर गुगल पेच्या माध्यमातून ३१ लाख कोटींचे व्यवहार पार पडले.

Web Title: UPI hits record high in April with 5 58 bn transactions worth Rs 9 83 trn increased more than 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.