Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवा पर्याय Buy Now Pay Latter तेजीनं होतोय लोकप्रिय, UPI ला टक्कर; पाहा काय आहे ऑप्शन

नवा पर्याय Buy Now Pay Latter तेजीनं होतोय लोकप्रिय, UPI ला टक्कर; पाहा काय आहे ऑप्शन

गेल्या काही दिवसांमध्ये बाय नाऊ पे लेटरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:09 PM2022-04-18T17:09:45+5:302022-04-18T17:10:16+5:30

गेल्या काही दिवसांमध्ये बाय नाऊ पे लेटरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

upi is giving tough competition to new payment option buy now pay later is becoming increasingly popular know what is that | नवा पर्याय Buy Now Pay Latter तेजीनं होतोय लोकप्रिय, UPI ला टक्कर; पाहा काय आहे ऑप्शन

नवा पर्याय Buy Now Pay Latter तेजीनं होतोय लोकप्रिय, UPI ला टक्कर; पाहा काय आहे ऑप्शन

किरकोळ ऑनलाइन व्यवहार प्लॅटफॉर्म UPI देशातील डिजिटल पेमेंट (Digital Payment) क्षेत्रात वर्चस्व कायम ठेवण्याची शक्यता आहे. BNPL आणि डिजिटल चलन यांसारख्या नवीन पद्धतींमुळे भविष्यातील पेमेंट परिभाषित होण्याची शक्यता आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), 'बाय नाऊ पे लेटर (BNPL), सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) आणि ऑफलाइन पेमेंट्स पुढील पाच वर्षांत भारतात डिजिटल पेमेंटच्या वाढीला गती देत राहतील असं पीडब्ल्यूसी इंडियाने एका अहवालाद्वारे म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार युपीआयचं डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठं योगदान राहणार आहे आणि त्यानंतर बीएनपीएल म्हणजेच बाय नाऊ पे लेटरचं स्थान असेल. भारतीय डिजिटल पेमेंट बाजारात संख्येच्या दृष्टीनं २३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मूल्याच्या दृष्टीनंही संख्या पुढील पाच वर्षांमध्ये ५९०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असं PwC द्वारे 'द इंडियन पेमेंट्स हँडबुक 2021-26' या शीर्षकानं जारी करण्यात आलेल्या अहवालातत नमूद करण्यात आलंय.

अहवालानुसार २०२०-२१ मध्ये UPI द्वारे २२ अब्ज डिजिटल व्यवहार झाले होते आणि २०२५-२६ पर्यंत ते १६९ अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे, वार्षिक आधारावर १२२ टक्क्यांची अतिशय मोठी वाढ नोंदविली जाऊ शकते. अहवालानुसार, UPI द्वारे कमी-मूल्याचे व्यवहार आणि आशियातील इतर देशांसोबत क्रॉस-बॉर्डर रेमिटन्ससाठी केलेली भागीदारी देखील या वाढीला चालना देत आहे.

का आवडतंय बीएनपीएल?
BNPL द्वारे ध्सध्या ३६,३०० कोटी रुपयांचे सुमारे ३६३ अब्ज व्यवहार झाले आहेत, जे पुढील पाच वर्षांत ३,१९,१०० कोटी रुपयांचे ३,१९१ अब्ज व्यवहार पार करतील अशी अपेक्षा आहे. बीएनपीएलचा पर्याय ई-कॉमर्सने सुरू केला होता, जो आता अॅपद्वारे पेमेंटचा पर्याय ऑफर करणाऱ्या इतर प्लॅटफॉर्मद्वारे स्वीकारला जात आहे. यामध्ये खरेदीवर तात्काळ पैसे देण्याऐवजी ठराविक मुदत दिली जाते. यामुळे ग्राहकांना पैसे भरण्यासाठी थोडा वेळ मिळतो आणि त्यांना त्यांच्या आवडीची खरेदी करताना चिंताही करावी लागत नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलंय.

नियामक, बँका, पेमेंट आणि फिनटेक कंपन्या, तसेच कार्ड नेटवर्क आणि सेवा प्रदात्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे डिजिटल पेमेंट उद्योगात येत्या काळात प्रचंड वाढ दिसून येण्याची शक्यता आहे, असं मत पीडब्ल्यूसी इंडियाचे भागीदार आणि पेमेंट्र ट्रान्सफॉर्मेशनचे प्रमुख मिहिर गांधी म्हणाले.

Web Title: upi is giving tough competition to new payment option buy now pay later is becoming increasingly popular know what is that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.