Join us

UPI पेमेंटमध्ये मोठी वाढ; पुढील 5 वर्षांत दररोज होतील 1 बिलियन पेमेंट्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 3:05 PM

UPI Payments : गेल्या काही दिवसांत डिजिटल व्यवहार वाढले आहेत.

नवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला डिजिटल पेमेंट मोड (Digital Payment) म्हणून उदयास आला आहे. गेल्या काही दिवसांत डिजिटल व्यवहार वाढले आहेत. बरेच लोक यूपीआय (UPI) पेमेंट करताना दिसून येतात. आजकाल सर्व काही डिजिटल झाले आहे. 

दरम्यान, UPI पेमेंट्सबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील 5 वर्षांत UPI व्यवहार दररोज एक बिलियनपर्यंत पोहोचू शकतात. तसेच, NPCI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2022 मध्ये UPI द्वारे 6.28 बिलियन पेमेंट्स करण्यात आले आहेत. जर किंमतीच्या आधारावर पाहिले तर ते 10.62 ट्रिलियन रुपये किंवा जवळपास 11 लाख कोटी रुपये आहे.

याचबरोबर, असेही म्हटले आहे की, UPI पेमेंटमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता पुढील 5 वर्षात यामध्ये अधिक तेजी दिसून येईल. UPI बाबत आगामी काळात दररोज एक बिलियन व्यवहार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जर असे पाहिले की, UPI व्यवहार कोठे झपाट्याने वाढत आहेत, तर त्यात केवळ प्रमुख शहरांची यादीच नाही तर टियर-2 आणि टियर-3 शहरांसह ग्रामीण भागांचाही समावेश आहे.

इन्फोसिसचे अध्यक्ष आणि UIDAI चे संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकानी यांनी भारतातील UPI प्रणालीचे कौतुक केले आहे. जवळपास 26 कोटी लोक UPI वापरत आहेत. तर, उर्वरित लोक आधार लिंक्ड पेमेंट सिस्टम वापरत आहेत, असे  नंदन निलेकानी यांनी म्हटले आहे. दरम्यान, UPI प्रणाली भारतात 2016 मध्ये लाँच करण्यात आली होती. आजच्या काळात, ही देशातील सर्वात लोकप्रिय आहे, या अंतर्गत देशात 10.72 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

UPI म्हणजे काय?UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे तुम्ही UPI द्वारे पैसे कधीही, रात्री किंवा दिवसा ट्रान्सफर करू शकता.

कसे काम करते पैसे ट्रान्सफरची UPI सिस्टम?हे फीचर वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Paytm, Phonepe, Google Pay, BHIM इत्यादी कोणतेही UPI अॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही तुमचे बँक खाते UPI अॅपशी लिंक करून ही सिस्टम वापरू शकता. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकाधिक UPI अॅप्सशी लिंक करू शकता. त्याचवेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू देते.

टॅग्स :व्यवसायडिजिटलपैसाबँक