नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२० मध्ये ‘युनिफाईड पेमेंट्स इंरफेस’ (यूपीआय) वरील आर्थिक व्यवहारांनी २ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला. मागील वर्षभरात यूपीआयवरील वित्त व्यवहार तब्बल ८० टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये यूपीआयवर १.१४ अब्ज व्यवहार झाले होते.नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ही माहिती दिली. या काळात व्यवहारांचे मूल्यही वाढून दुप्पट झाले आहे, असे त्यांनी सांगितले. कांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अद्भूत! यूपीआयवरील व्यवहारांनी ऑक्टोबर २०२० मध्ये २ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये यूपीआयवर १.१४ अब्ज व्यवहार झाले होते. गेल्या महिन्यात २.०७ अब्ज व्यवहार झाले. व्यवहारांतील मूल्य १०१ टक्क्यांनी वाढून १,९१,३५९.९४ कोटी रुपयांवरून ३,८६,१०६.७४ कोटी झाले आहे.’सूत्रांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर केल्यामुळे यूपीआयला फायदा झाला आहे. सणासुदीच्या हंगामामुळे डिजिटल व्यवहार वाढले असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
८० टक्क्यांनी वाढले यूपीआय पेमेंट्स, आर्थिक व्यवहारांनी २ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 1:29 AM