Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI Payments Rule : बँकेत पैसे नाहीत? तरी करू शकता UPI पेमेंट, जाणून घ्या नियम आणि अटी

UPI Payments Rule : बँकेत पैसे नाहीत? तरी करू शकता UPI पेमेंट, जाणून घ्या नियम आणि अटी

येत्या काही दिवसांत UPI पेमेंटमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात येणार आहे, ज्यानंतर यूजर्स बँकेत पैसे नसले तरी ऑनलाइन पेमेंट करू शकतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 12:48 PM2023-04-09T12:48:11+5:302023-04-09T12:48:40+5:30

येत्या काही दिवसांत UPI पेमेंटमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात येणार आहे, ज्यानंतर यूजर्स बँकेत पैसे नसले तरी ऑनलाइन पेमेंट करू शकतील.

UPI Payments Rule No money in the bank still Can make UPI payment though know the terms and conditions | UPI Payments Rule : बँकेत पैसे नाहीत? तरी करू शकता UPI पेमेंट, जाणून घ्या नियम आणि अटी

UPI Payments Rule : बँकेत पैसे नाहीत? तरी करू शकता UPI पेमेंट, जाणून घ्या नियम आणि अटी

UPI Payments Rule : भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आगामी काळात UPI पेमेंटला चालना मिळण्याची शक्यता आहे. वास्तविक RBI नं जाहीर केलं की बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही UPI पेमेंट करू शकाल. ही एक प्रकारची क्रेडिट सुविधा असेल, ज्यामध्ये तुम्ही बँकेकडून पैसे घेऊ शकाल.

तुमच्या बँक खात्यात आता पैसे नसल्यास तुम्हाला UPI द्वारे पेमेंट करता येत नाही. पण जर तुम्ही फोन वॉलेटमध्ये आधीच काही पैसे जमा केले असतील तर त्याच्या मदतीनं ऑनलाइन पेमेंट करता येईल. मात्र, तुम्हाला हे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये आधीच ॲड करावे लागतील. परंतु नवीन सुविधेनुसार, जर तुमच्या वॉलेट आणि बँक खात्यात पैसे नसतील तरी तुम्ही बँकेकडून पैसे घेऊ शकाल.

क्रेडिट कार्डाचे टेन्शन नाही
सोप्या शब्दात समजून घेतल्यास हे अगदी क्रेडिट कार्डच्या सुविधेप्रमाणेच असेल. तुम्हाला यासाठी कोणत्याही प्रकारच्या कार्डाची गरज भासणार नाही. ग्राहक केवळ ऑनलाइन मोडद्वारे क्रेडिट कार्डसारख्या सुविधेचा आनंद घेऊ शकतील. तथापि, यासाठी तुम्हाला या पैशांवर व्याज द्यावे लागेल आणि तेही क्रेडिट कार्डप्रमाणेच. म्हणजे येत्या काही दिवसांत क्रेडिट कार्ड घेऊन जाण्याचा त्रास संपण्याची शक्यता आहे.

ठरलेल्या वेळेत पैसे फेडा
या सुविधेमध्ये, ग्राहत क्रेडिट कार्डप्रमाणे निश्चित रक्कम उधार घेऊ शकतील. यासाठी बँका प्रत्येक ग्राहकाची क्रेडिट लाइन, एखादी व्यक्ती किती कर्ज घेऊ शकेल हे आधीच ठरवतील. त्याचप्रमाणे तुम्ही UPI पेमेंटची देय रक्कम निश्चित वेळेत न भरल्यास तुमच्याकडून अतिरिक्त व्याज आकारले जाईल.

Web Title: UPI Payments Rule No money in the bank still Can make UPI payment though know the terms and conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.