Lokmat Money > बिझनेस न्यूज > PhonePe, Google pay वर क्रेडिट कार्ड सारखी सुविधा मिळणार, खात्यात पैसे नसतानाही खर्च करता येणार!

PhonePe, Google pay वर क्रेडिट कार्ड सारखी सुविधा मिळणार, खात्यात पैसे नसतानाही खर्च करता येणार!

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, देशात UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार वेगाने वाढत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 03:26 PM2023-04-06T15:26:59+5:302023-04-06T15:29:31+5:30

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, देशात UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार वेगाने वाढत आहेत

upi paytm phonepe google pay customers to get pre approoved credit line rbi governor shaktikanta das said | PhonePe, Google pay वर क्रेडिट कार्ड सारखी सुविधा मिळणार, खात्यात पैसे नसतानाही खर्च करता येणार!

PhonePe, Google pay वर क्रेडिट कार्ड सारखी सुविधा मिळणार, खात्यात पैसे नसतानाही खर्च करता येणार!

नवी दिल्ली : आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी गुरुवारी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सारखे ऑप्शन अधिक आकर्षक बनवण्यासाठी मोठी घोषणा केली. चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर गव्हर्नर म्हणाले की, आता UPI वर सुद्धा युजर्सला क्रेडिट कार्ड सारखी सुविधाही मिळेल. पूर्व-मंजूर (Pre-sanctioned) रक्कम बँकांकडून युजर्सना दिली जाईल, जी खात्यात पैसे नसतानाही वापरली जाऊ शकते.

गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, देशात UPI च्या माध्यमातून होणारे व्यवहार वेगाने वाढत आहेत. ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय करण्यासाठी आणि युजर्सना अधिक सुविधा देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. Paytm, PhonePe किंवा Google Pay सारख्या अॅप्सद्वारे UPI पेमेंट करणाऱ्या युजर्सना आता पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन दिली जाईल. ही रक्कम बँका किंवा वित्तीय संस्था ठरवतील. युजर्स आपल्या खात्यात पैसे नसतानाही ही रक्कम वापरू शकतील. तसेच, आरबीआयच्या या उपक्रमामुळे इनोव्हेशनला आणखी प्रोत्साहन मिळेल.

काय आहे क्रेडिट लाइन?
क्रेडिट लाइन ही बँकेद्वारे युजर्ससाठी सेट केलेली मर्यादा असणार आहे. युजर्स खर्च करू शकणारी रक्कम असणार आहे. बँका आणि वित्तीय संस्था युजर्सचे उत्पन्न आणि कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करून ही क्रेडिट लाइन तयार करतील. एक प्रकारे UPI वर ओव्हरड्राफ्ट सारखी सुविधा देखील दिली जाईल. जिथे युजर्स गरजेनुसार ही रक्कम वापरेल आणि नंतर ही रक्कम व्याजासह परत करेल. दरम्यान, या सुविधेच्या बदल्यात बँका तुमच्याकडून काही व्याज आकारतील. प्रत्येक युजर्सच्या जोखीम क्षमतेचे मूल्यांकन केल्यानंतरच बँका पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन तयार करतील.

UPI ला लिंक करू शकता क्रेडिट कार्ड
गव्हर्नर म्हणाले की, आज भारतात UPI द्वारे जास्तीत जास्त पेमेंट केले जात आहे. त्यामुळे किरकोळ व्यवहार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. बँकांनी देखील UPI च्या ताकदीचा फायदा घेऊन आपली स्वतःची उत्पादने आणि फीचर्स विकसित केली आहेत. एमपीसीच्या बैठकीत क्रेडिट कार्डला UPI शी लिंक करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. सध्या, युजर्स रुपे क्रेडिट कार्डला (RuPay Credit Card)  UPI शी लिंक करू शकतील.

UPI द्वारे व्यवहार वाढले
जर तुम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, एकूण 8.7 अब्ज व्यवहार UPI द्वारे करण्यात आले आहेत. ते वार्षिक आधारावर 60 टक्क्यांनी वाढत आहेत. जर आपण गेल्या 12 महिन्यांच्या डेटावर नजर टाकली तर दररोज सरासरी 36 कोटी व्यवहार UPI द्वारे झाले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या 24 कोटी व्यवहारांपेक्षा हा आकडा 50 टक्के अधिक आहे.

Web Title: upi paytm phonepe google pay customers to get pre approoved credit line rbi governor shaktikanta das said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.