Lokmat Money > बिझनेस न्यूज > मे महिन्यातील उच्चांक गाठल्यानंतर जूनमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये घट

मे महिन्यातील उच्चांक गाठल्यानंतर जूनमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये घट

जूनमध्ये इतरही ऑनलाइन व्यवहारांमध्ये घट झालेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 07:49 AM2024-07-02T07:49:47+5:302024-07-02T07:50:21+5:30

जूनमध्ये इतरही ऑनलाइन व्यवहारांमध्ये घट झालेली आहे.

UPI transactions decline in June after peaking in May | मे महिन्यातील उच्चांक गाठल्यानंतर जूनमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये घट

मे महिन्यातील उच्चांक गाठल्यानंतर जूनमध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये घट

नवी दिल्ली : मे महिन्यात व्यवहारांचा उच्चांक गाठल्यानंतर जूनमध्ये युपीआय व्यवहारांच्या संख्येत १ टक्के घट झाली आहे. याशिवाय व्यवहारांच्या रकमेतही किरकाेळ घट झाली आहे.

मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत ४९ टक्के तर एकूण रकमेत ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मेमध्ये एकूण १४.०४ अब्ज व्यवहार झाले. तर जून महिन्यात हा आकडा १३.८९ अब्ज एवढा हाेता.  जूनमध्ये इतरही ऑनलाइन व्यवहारांमध्ये घट झालेली आहे.

सर्वाधिक वापर काेणाचा? 

फाेन पे     ४९.२१%
गुगल पे    ३७.६०%
पेटीएम    ८.२१%
क्रेड    १.०१%
ॲमेझाॅन पे     ०.४९%
ॲक्सिस बॅंक     ०.४६%
आयसीआयसीआय बॅंक     ०.३८%
फॅम     ०.३६%
काेटक बॅंक     ०.३१%
व्हाॅट्सॲप    ०.२६% 
 

 

 

Web Title: UPI transactions decline in June after peaking in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.