नवी दिल्ली : देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. त्यात यूपीआयची माेठी भूमिका राहिली आहे.
गेल्या वर्षी म्हणजे, २०२२ मध्ये तब्बल सुमारे ७४ अब्ज व्यवहार झाले आणि त्यातून १२६ लाख काेटी रुपयांची देवाणघेवाण यूपीआयच्या माध्यमातून झाली आहे. २०२१ च्या तुलनेत त्यात अनुक्रमे ७० आणि ५४ टक्के वाढ झाली आहे. ‘वर्ल्डलाइन’ने याबाबत अहवाल सादर केला आहे.
१४९.५ लाख काेटींची देवाणघेवाण यूपीआय, क्रेडिट-डेबिट कार्ड, इत्यादींच्या माध्यमातून झाली.
८७.९२ अब्ज व्यवहार झाले.
डिजिटल पेमेंटमध्ये
ही शहरे आघाडीवर
शहर व्यवहार मूल्य (काेटी) (अब्ज रु.)
बंगळुरू २.९ ६५
दिल्ली १.९६ ५०
मुंबई १.८७ ४९.५
पुणे १.५ ३२.८
चेन्नई १.४३ ३५.५
लाेकांची आर्थिक देवाणघेवाण, खरेदी-विक्रीसाठी सर्वाधिक पसंती यूपीआयला.