Join us

UPI: ‘यूपीआय पेमेंट’ची माेठ्ठी भरारी!, गेल्या वर्षी १२६ लाख काेटींची देवाणघेवाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:00 PM

UPI: देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. त्यात यूपीआयची माेठी भूमिका राहिली आहे. 

नवी दिल्ली : देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. त्यात यूपीआयची माेठी भूमिका राहिली आहे. गेल्या वर्षी म्हणजे, २०२२ मध्ये तब्बल सुमारे ७४ अब्ज व्यवहार झाले आणि त्यातून १२६ लाख काेटी रुपयांची देवाणघेवाण यूपीआयच्या माध्यमातून झाली आहे. २०२१ च्या तुलनेत त्यात अनुक्रमे ७० आणि ५४ टक्के वाढ झाली आहे. ‘वर्ल्डलाइन’ने याबाबत अहवाल सादर केला आहे. 

१४९.५ लाख काेटींची देवाणघेवाण यूपीआय, क्रेडिट-डेबिट कार्ड, इत्यादींच्या माध्यमातून झाली.८७.९२ अब्ज व्यवहार झाले.डिजिटल पेमेंटमध्ये ही शहरे आघाडीवरशहर    व्यवहार     मूल्य         (काेटी)    (अब्ज रु.)    बंगळुरू    २.९    ६५दिल्ली    १.९६    ५०मुंबई     १.८७    ४९.५पुणे    १.५    ३२.८चेन्नई    १.४३    ३५.५

लाेकांची आर्थिक देवाणघेवाण, खरेदी-विक्रीसाठी सर्वाधिक पसंती यूपीआयला.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रपैसा