Lokmat Money > बिझनेस न्यूज > सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित?

सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित?

UPI Wallet : UPI ही Paytm, PhonePe, Google Pay सारख्या पेमेंट अ‍ॅप्सद्वारे वापरली जाणारी पेमेंट सिस्टम आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागते. UPI वॉलेटमध्ये याची गरज पडत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:45 PM2024-10-22T12:45:21+5:302024-10-22T12:49:09+5:30

UPI Wallet : UPI ही Paytm, PhonePe, Google Pay सारख्या पेमेंट अ‍ॅप्सद्वारे वापरली जाणारी पेमेंट सिस्टम आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागते. UPI वॉलेटमध्ये याची गरज पडत नाही.

upi wallet is more secure than upi know here why it is so important for all of us | सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित?

सायबर गुन्हेगारांचा वाटतोय धोका? UPI की UPI Wallet कुठले वापरणे अधिक सुरक्षित?

UPI Wallet : देशात यूपीआयची (UPI) एन्ट्री झाल्यापासून लोकांचे आर्थिक व्यवहार खूप सुलभ झाले आहेत. UPI मुळे आता पूर्वीसारखी रोख रक्कम जवळ बाळगण्याची गरज पडत नाही. वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी NPCI यूपीआयमध्ये सतत सुधारणा करत आहे. NPCI ने लहान व्यवहारांसाठी आता UPI Wallet लाँच केलं आहे. हे फक्त सोयीचे नाही तर अनेक प्रकारे सुरक्षित देखील आहे. वास्तविक, यूपीआयचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक अकाउंट लिंक करणे आवश्यक आहे. तर UPI Wallet वापरण्यासाठी या खात्यात तुम्हाला पैसे ट्रान्सफर करुन ठेवावे लागतात.

UPI आणि UPI वॉलेटमध्ये काय फरक आहे?
UPI ही Paytm, PhonePe, Google Pay सारख्या पेमेंट अ‍ॅप्सद्वारे वापरली जाणारी पेमेंट सिस्टम आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागते. UPI तुमच्या बँक खात्यातून थेट प्राप्तकर्त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवते. तर UPI वॉलेट UPI शी लिंक केलेले असते. UPI द्वारे त्यात पैसे जमा केले जातात. तुम्ही जेव्हा पेमेंट करता तेव्हा तुमच्या वॉलेटमधून पैसे थेट दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.

छोट्या पेमेंटसाठी UPI वॉलेटचे फायदे
UPI वॉलेटचा वापर छोट्या व्यवहारांसाठी केला जातो. याद्वारे तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त १००० रुपये आणि एका दिवसात १०,००० रुपये ट्रान्सफर करू शकता. अशा परिस्थितीत कोणतीही मोठी आर्थिक फसवणूक होण्याचा धोका यात कमी होतो. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगार UPI च्या माध्यमातूनही अनेक प्रकारे फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अनेकजण आपल्या आयुष्यभराची कमाई गमावून बसले आहेत.

अधिक सोयीस्कर
UPI वॉलेटद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही. अनेकदा आपल्या किरकोळ पेमेंट करण्यासाठी सारखे पिन टाकत बसावे लागतात. अशा परिस्थितीत यूपीआय वॉलेटद्वारे पेमेंट जलद आणि सोयीस्कर पद्धतीने केले जाऊ शकते.

पेमेंट फेल होण्याची शक्यता कमी
UPI वॉलेट एका वेळी जास्तीत जास्त १००० रुपये ट्रान्सफर करू शकते. तुमचे बँक खाते यामध्ये लिंक केलेले नाही किंवा UPI पिन टाकण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत, UPI वॉलेटद्वारे ट्रांझक्शन फेल होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

Web Title: upi wallet is more secure than upi know here why it is so important for all of us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.