GST Reward Scheme, Mera Bill Mera Adhikaar: वस्तू आणि सेवा करावर, सरकारला बनावट बिलं आणि बनावट नोंदणींबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनीही गेल्या काही महिन्यांत याविरोधात मोहीम सुरू केली आहे. आता बनावट बिलांना आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांना जागरूक करण्यासाठी, सरकार एक नवीन रिवॉर्ड योजना आणत आहे, ज्या अंतर्गत तुम्ही एकाच बिलाद्वारे लाखोंची बक्षिसे जिंकू शकता.
काय आहे योजना?सरकार १ सप्टेंबरपासून सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'मेरा बिल मेरा अधिकार' प्रोत्साहन योजना सुरू करणार आहे. याच्या मोबाइल अॅपवर बिल 'अपलोड' करून, लोक १०,००० रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतची रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा उद्देश लोकांना प्रत्येक वेळी खरेदी करताना बिलं मागण्यास प्रवृत्त करणे हा असल्याची माहिती, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळानं सांगितलं. ही योजना सध्या आसाम, गुजरात आणि हरियाणा, पुडुचेरी, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीमध्ये सुरू केली जाणार आहे.
सीबीआयसीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचं ट्विटर) यावर ही माहिती दिली. आपलं जीएसटी असलेलं बिल अपलोड केल्यानंतर लोकांना रोख रक्कम मिळू शकते, असं त्यांनी नमूद केलंय.
या गोष्टी लक्षात ठेवा‘मेरा बिल मेरा अधिकार’हे अॅप iOS आणि Android दोन्ही वर उपलब्ध असेल. यावर अपलोड करण्यात आलेल्या इनव्हॉईसमध्ये विक्रेत्याचा GSTIN, इनव्हॉईस नंबर, भरलेली रक्कम आणि टॅक्सची माहिती असणं अनिवार्य आहे. बिलाचं किमान मूल्य २०० रुपये असणं अनिवार्य आहे.