Join us

UPS Calculation: ५० हजार बेसिक सॅलरी, मग UPS अंतर्गत किती पेन्शन मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 2:01 PM

UPS अंतर्गत, आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या ५०% निश्चित पेन्शन म्हणून देण्यात येईल.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. जी नॅशनल पेन्शन योजनेसारखीच असेल. या योजनेची सुरुवात १ एप्रिल २०२५ पासून होईल. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एक निश्चित पेन्शन देण्यासाठी या योजनेची घोषणा केली. यूनिफाइड पेन्शन योजना(UPS) अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पेन्शनची तरतूद आहे. त्याशिवाय मिनिमम एश्योर्ड पेन्शनही दिलं जाईल. 

यूनिफाइड पेन्शन योजना(UPS) काय आहे?

शनिवारी कॅबिनेटमध्ये यूनिफाइड पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. UPS अंतर्गत आता निवृत्त कर्मचाऱ्यांना १२ महिन्याच्या सरासरी पगारावर ५० टक्के ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांना कमीत कमी २५ वर्ष सेवा द्यावी लागेल. 

जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर कुटुंबाला पेन्शन दिली जाईल. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन ६० टक्के असेल. 

मिनिमम एश्योर्ड पेन्शनही दिली जाईल, ज्याचा अर्थ जे कर्मचारी १० वर्षापर्यंत नोकरी करतील त्यांना कमीत कमी १० हजार रुपये पेन्शन दिली जाईल. 

कोणाला मिळणार लाभ?

यूनिफाइड पेन्शन योजनेतंर्गत जवळपास २३ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. जर राज्य सरकारने ही योजना लागू केली तर त्या कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळेल. यूनिफाइड पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना ठराविक पेन्शन आणि कुटुंबालाही पेन्शन देऊन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याची योजना आहे. त्याशिवाय जसजसं महागाई वाढेल तसं या योजनेत पेन्शन वाढीची तरतूद आहे. UPS आणि NPS मधील एकच पर्याय निवडावा लागेल. जर तुम्ही यूपीएस पर्याय निवडला तर पुन्हा कधी NPS निवडता येणार नाही. जर NPS निवडला तर पुन्हा UPS निवडता येणार नाही.

५० हजार बेसिक पगारावर किती पेन्शन मिळणार?

या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर १२ महिन्यांनी सरासरी बेसिक पगाराच्या ५० टक्के पेन्शन म्हणून दिली जाईल. त्याचं कॅलक्युलेशन करायचं झालं तर तुम्ही एक सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्ही NPS ऐवजी UPS पर्याय निवडला, तुमचा अखेरचा बेसिक पगार ५० हजार रुपये असेल तर या योजनेतंर्गत तुम्हाला निवृत्तीनंतर दर महिना २५ हजार रुपये पेन्शन मिळेल. त्याशिवाय महागाई भत्ता वेगळा असेल. जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याची पेन्शन ३० हजार मासिक असेल तर त्याच्या कुटुंबाला १८ हजार रुपये पेन्शन मिळेल.  

टॅग्स :केंद्र सरकार