Join us

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात महागाई जास्त

By admin | Published: October 23, 2015 2:46 AM

देशात गेल्या काही महिन्यांत महागाईत घट होत चालली असली तरीही त्याचा सर्वांनाच सारखा फायदा मिळत नाही. कारण ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा महागाईचा दर जास्त

नवी दिल्ली : देशात गेल्या काही महिन्यांत महागाईत घट होत चालली असली तरीही त्याचा सर्वांनाच सारखा फायदा मिळत नाही. कारण ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा महागाईचा दर जास्त असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे असे होत आहे.एचएसबीसी या जागतिक वित्तीय सेवा कंपनीच्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली. ग्रामीण भागात इंधन, अन्नधान्ये आणि आणखी काही वस्तूंचे दर जास्त असल्याचे हा अहवाल म्हणतो.सध्या केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर महागाईचे प्रमाण घटले आहे. पण पायाभूत सेवासुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील लोकांना घटत्या महागाईचा फायदा मिळत नाही. सध्या भारतात महागाईचा दर ५.५ टक्के असून तो रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा कमी आहे, असे एचएसबीसी म्हणते.ग्रामीण भागात महागाईचा दर ६.५ टक्के तर शहरी भागात तो ४.५ टक्के आहे. आयात स्वस्तात होते, पण त्याचा फायदा ग्रामीण भागातील रहिवाशांना होत नाही, त्यामुळे ग्रामीण भागाच्या व्हावयाच्या विकासाला ब्रेक लागत आहे. खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरूनही त्याचा लाभ ग्रामीण भागापर्यंत गेलेला नाही, असेही हा अहवाल म्हणतो.