Lokmat Money > बिझनेस न्यूज > येणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेची सवलत; हुवेई कंपनीवर लादले निर्बंध

येणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेची सवलत; हुवेई कंपनीवर लादले निर्बंध

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीमुळे अमेरिका चीनवर नाराज असून, आता नव्याने चीनबरोबर व्यापाारयुद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 05:04 AM2020-05-18T05:04:58+5:302020-05-18T05:05:01+5:30

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीमुळे अमेरिका चीनवर नाराज असून, आता नव्याने चीनबरोबर व्यापाारयुद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

US concessions to incoming companies; Restrictions imposed on Huawei | येणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेची सवलत; हुवेई कंपनीवर लादले निर्बंध

येणाऱ्या कंपन्यांना अमेरिकेची सवलत; हुवेई कंपनीवर लादले निर्बंध

वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसू लागली असून, चीनमधून अमेरिकेत येणाºया कंपन्यांना करांमध्ये सवलत देण्याची तयारी अमेरिकेने दाखविली आहे. दरम्यान चीनमधील मोठी कंपनी असलेल्या हुवेईवर अमेरिकेने नव्याने निर्बंध घातले आहे.
चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीमुळे अमेरिका चीनवर नाराज असून, आता नव्याने चीनबरोबर व्यापाारयुद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आपले प्रकल्प अमेरिकेमध्ये घेऊन येणाºया कंपन्यांना करांमध्ये सूट देण्याची तयारी दर्शविली आहे. अद्याप याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला नसला तरी अमेरिकेमध्ये व्यवसाय करण्यास या कंपन्यांना सर्वाधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अनेक परदेशी कंपन्यांनी चीनमधून आपला कारभार गुंडाळून अन्य देशांमध्ये स्थलांतरित होण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भारत, व्हिएतनाम, तैवान हे प्रमुख पर्याय या कंपन्यांसमोर आहेत. असे असले तरी काही अमेरिकन कंपन्या आपला कारभार मायदेशामध्ये सुरू करण्यास उत्सुक आहेत.


अमेरिकेकडून कंपनीवर निर्बंध
चीनमधील तांत्रिक सेवा पुरविणारी एक मोठी कंपनी हुवेईवर अमेरिकेने नव्याने निर्बंध लागू केले आहे. हुवेई कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये अमेरिकन तंत्रज्ञान तसेच डिझाइनचा वापर करीत असते. मात्र हे करताना अमेरिकन सूचनांचे पालन कंपनी करीत नसल्याने त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आल्याचे अमेरिकेचे व्यापर सचिव व्हिल्बर रॉर्स यांनी जाहीर केले आहे. या निर्बंधांनुसार सेमी कंडक्टर उत्पादक कंपन्यांना हुवेईला मालाचा पुरवठा करण्याआधी अमेरिकेचे लायसन्स घेणे बंधनकारक ठरणार आहे.

मोबाइल कंपनी प्रकल्प हलविणार भारतामध्ये
नवी दिल्ली : मोबाइलचे सुटे भाग बनविणारी एक मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी चीनमधील आपला प्रकल्प कायमचा बंद करून भारतामध्ये आपला व्यवसाय हलवित असल्याचे कंपनीच्या संचालकांनी सांगितले. यापुढे आम्ही भारतातून चीनला मोबाइलची निर्यात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे येत्या पाच वर्षांत भारतामध्ये आठशे कोटी रुपये गुंतविण्याचा मानसही या कंपनीने व्यक्त केला आहे. लावा इंटरनॅशनल या मोबाइल कंपनीचे अध्यक्ष हरिओम राय यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही चीनच्या प्रकल्पातून काही मोबाइल फोनची जगभरात निर्यात करतो, आता हे काम भारतामधून केले जाणार आहे. अनेक भारतीय कंपन्या या आधीपासूनच चीनला मोबाइल चार्जरची निर्यात करीत आहे.

Web Title: US concessions to incoming companies; Restrictions imposed on Huawei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.