वॉशिंग्टन : सध्या मंदीमध्ये अडकलेली अर्थव्यवस्था लवकरच काम सुरू करेल, मात्र ही परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी वर्तविली आहे.
अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख आर्थिक सल्लागारांनी चीनमधून अमेरिकेत परतणाऱ्या कंपन्यांना करामध्ये सवलत देण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांचे हे प्रतिपादन महत्त्वाचे मानले जात आहे. अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले व्यापारयुद्ध पुन्हा जोर पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना पॉवेल म्हणाले की, अमेरिकन अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करणे कोणालाही शक्य होणारे नाही. सध्या मंदीमध्ये असलेली अमेरिकन अर्थव्यवस्था लवकरच पुन्हा वाढ दर्शवेल. मात्र त्यासाठी थोडा अधिक काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. कदाचित यासाठी पुढील वर्षाची अखेरही उजाडू शकेल.
अमेरिकन अर्थव्यवस्था पुढील वर्षात येईल रुळावर
अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले व्यापारयुद्ध पुन्हा जोर पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:22 AM2020-05-19T01:22:48+5:302020-05-19T01:23:17+5:30