शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशी
अमेरिकेने कायम राखलेले व्याजदर, परकीय वित्तसंस्थांकडून सुरूच असलेली खरेदी, डॉलरच्या तुलनेत काहीसे वाढलेले रुपयाचे मूल्य आणि चालू खात्यावरील तोट्यामध्ये झालेली घट अशा सकारात्मक बाबींमुळे बाजारात गतसप्ताहामध्ये तेजीचे वातावरण राहिले. सप्ताहाच्या अखेरीस नफा कमविण्यासाठी विक्री झाल्याने वाढ काही प्रमाणात मर्यादित झालेली दिसून आली.
गतसप्ताहातील पाच दिवसांपैकी केवळ दोनच दिवस निर्देशांक वाढला. मात्र, ही वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याने विक्रीच्या दबावाने निर्देशांक खाली आला, तरीही संपूर्ण सप्ताहाचा विचार करता, निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झालेले दिसून आले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६९.१९ अंशांनी वाढून २८६६८.२२ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात ०.२४ टक्कयांनी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ५१.७० अंश म्हणजे ०.५९ टक्क््यांनी वाढून ८८३१.५५ अंशांवर बंद झाला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सर्व व्याजदर कायम राखण्याचा जाहीर केलेला निर्णय भारतीय शेअर बाजारासाठी लाभदायक ठरला. अमेरिकन व्याजदराबाबतची अनिश्चितता संपल्याने, परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक पुन्हा एकदा आशियाई बाजारांकडे वळलेली दिसून आली. गतसप्ताहामध्ये या संस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये २३७.६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर महिन्यात २३ तारखेपर्यंत या संस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये ९५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याबाबत केंद्र सरकारने उचललेली पावले बघता, या कराची अंमलबजावणी लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळेही परकीय वित्तसंस्थांचा गुंतवणुकीमधील उत्साह वाढलेला दिसून आला आहे.
भारताच्या आयात-निर्यात व्यापारातील तफावत आता कमी होत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये आयात-निर्यात व्यापारातील तफावत ०.१ टक्क््याने कमी झाली आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षा त्यामध्ये १.२ टक्क््यांनी घट झाली आहे. डॉलर आणि रुपयाच्या
विनिमय दरामध्येही बदल होत असून, भारतीय रुपया थोड्या प्रमाणात बळकट होताना दिसत आहे. गतसप्ताहाच्या अखेरीस भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ०.३४ टक्क््यांनी मजबूत झाला.
आठवड्यातील घडामोडी
अमेरिकेन फेडरल रिझर्व्हने राखले सर्व व्याजदर कायम, परकीय वित्तसंस्थांकडून भारतीय बाजारातील खरेदी सुरूच, पहिल्या तिमाहीत भारताच्या चालू खात्यावरील तोट्यामध्ये झाली काहीशी घट, डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाच्या मूल्यामध्ये थोडीशी वाढ, बीएसई आय टी आणि एफएमसीजी या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घट.
अमेरिकन व्याजदर, परकीय वित्तसंस्थांनी तारले
अमेरिकेने कायम राखलेले व्याजदर, परकीय वित्तसंस्थांकडून सुरूच असलेली खरेदी, डॉलरच्या तुलनेत काहीसे वाढलेले रुपयाचे मूल्य आणि चालू खात्यावरील
By admin | Published: September 25, 2016 11:53 PM2016-09-25T23:53:01+5:302016-09-25T23:53:01+5:30