नवी दिल्ली - बहुप्रतीक्षित ‘जैवसुरक्षा कायद्या’च्या मसुद्यास अमेरिकी संसदेच्या लोकप्रतिनिधीगृहाने ९ सप्टेंबर रोजी मंजुरी दिली असून, अंतिम मंजुरीसाठी तो सिनेट सभागृहात जाईल. यामुळे ५ चिनी जैवऔषधी कंपन्यांशी व्यवहार करण्यास अमेरिकी औषधी कंपन्यांना बंदी घातली आहे. त्याचा भारतीय औषधी कंपन्यांना थेट फायदा होईल.
या कायद्याद्वारे चीनच्या वुशी ॲपटेक, वुशी बायाेजिक्स, बीजीआय, एमजीआय आणि कंप्लिट जिनोमिक्स या पोच कंपन्यांशी संबंध ठेवण्यावर अमेरिकी औषधी कंपन्यांना बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्या कंपन्यांना होणार थेट फायदा?
१२० अमेरिकी जैवऔषधी कंपन्या या कायद्याच्या कक्षेत येतील. त्यांना चिनी कंपन्यांची दारे बंद झाल्याने त्या भारतीय जैवऔषधी कंपन्यांकडे वळतील, असा अंदाज आहे. याचा थेट फायदा दिवीज लॅब, लॉराज लॅब, न्यूलँड लॅबोरेटरीज, सिंजेन, सुवेन फार्मा आणि पिरामल फार्मा या भारतीय कंपन्यांना होईल.