Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेचे भारतावर सुधारणांसाठी दडपण

अमेरिकेचे भारतावर सुधारणांसाठी दडपण

व्यावसायिक वातावरण सुदृढ करण्यासाठी आर्थिक सुधारणांचा वेग वाढवा, असे अमेरिकेने भारताला बजावले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार

By admin | Published: September 22, 2015 10:11 PM2015-09-22T22:11:26+5:302015-09-22T22:11:26+5:30

व्यावसायिक वातावरण सुदृढ करण्यासाठी आर्थिक सुधारणांचा वेग वाढवा, असे अमेरिकेने भारताला बजावले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार

US repression reforms | अमेरिकेचे भारतावर सुधारणांसाठी दडपण

अमेरिकेचे भारतावर सुधारणांसाठी दडपण

वॉशिंग्टन : व्यावसायिक वातावरण सुदृढ करण्यासाठी आर्थिक सुधारणांचा वेग वाढवा, असे अमेरिकेने भारताला बजावले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार परिषदेच्या (यूएसआयबीसी) पहिल्या सत्रात संबोधित करताना अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बाईडन बोलत होते. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन करीत आहेत.
ही बैठक म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे, असे सांगून ज्यो बाईडन म्हणाले की, बौद्धिक संपदेच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आणखी पावले उचलणे आणि व्यापारांच्या सामायिक नियमानुसार व्यापाराला आणखी उदार बनविण्याची गरज आहे. हवामानबदलविषयक प्रकरणात परस्पर सहकार्य देण्याची गरज आहे. त्यातून जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांत आर्थिक वृद्धीचे नवीन युग सुरू होऊ शकते.
ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे जागतिक स्तरावर पालन केले जात आहे. त्यामुळे बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी आम्हाला आणखी आर्थिक सुधारणांची गरज आहे.

Web Title: US repression reforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.