Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेचा भारतासह १५ देशांना धक्का! कट्टर शत्रूला मदत केल्याचा आरोप करत केली कारवाई

अमेरिकेचा भारतासह १५ देशांना धक्का! कट्टर शत्रूला मदत केल्याचा आरोप करत केली कारवाई

America Vs Russia : रशियाला मदत करणाऱ्या देशांना शिक्षा करणे हा या संयुक्त कारवाईचा उद्देश असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर यापूर्वीच अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:05 AM2024-10-31T10:05:01+5:302024-10-31T10:06:25+5:30

America Vs Russia : रशियाला मदत करणाऱ्या देशांना शिक्षा करणे हा या संयुक्त कारवाईचा उद्देश असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर यापूर्वीच अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत.

us sanctions 398 companies from 15 countries that help russia | अमेरिकेचा भारतासह १५ देशांना धक्का! कट्टर शत्रूला मदत केल्याचा आरोप करत केली कारवाई

अमेरिकेचा भारतासह १५ देशांना धक्का! कट्टर शत्रूला मदत केल्याचा आरोप करत केली कारवाई

America Vs Russia : सध्या अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे युक्रेन आणि रशियाचेयुद्ध २ वर्षांपासून सुरू आहे. तर दुसरीकडे इराण आणि इस्रायलमध्येही संघर्षाची ठिणगी पडलीय. अशात अमेरिकन सरकारने मोठा निर्णय घेतला. बुधवारी अमेरिकेने भारत, रशिया आणि चीनसह सुमारे १५ देशांतील ३९८ कंपन्यांवर बंदी घातली. युक्रेनविरुद्ध रशियाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी उत्पादने आणि सेवा पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी आणि स्टेट डिपार्टमेंट्सने ही संयुक्त कारवाई केली आहे. रशियाला युद्धात अप्रत्यक्षरित्या मदत करणे आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या वित्त विभागाने रशियाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या देशांशी संबंधित ३९८ कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यापैकी २७४ कंपन्यांवर रशियाला प्रगत तंत्रज्ञान पुरवल्याचा आरोप आहे.

संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांवरही बंदी
रशियास्थित संरक्षण आणि उत्पादन कंपन्यांचाही बंदी घालण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये समावेश आहे. या कंपन्या युक्रेनविरुद्ध वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांशी संबंधित उत्पादने तयार करतात. याशिवाय अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने रशियन संरक्षण मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण कंपन्यांचा समूह आणि चीनस्थित कंपन्यांवरही राजनैतिक निर्बंध लादले आहेत. या कंपन्या दुहेरी वापराच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीत गुंतलेल्या आहेत.

डेप्युटी ट्रेझरी सेक्रेटरी वॅली ॲडमो यांनी सांगितले की, युनायटेड स्टेट्स आणि त्यांचे सहयोगी देश युक्रेनच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. रशियाची युद्ध यंत्रणा कमकुवत करणे. पाश्चात्य निर्बंधांचा उल्लंघन करणाऱ्यांना रोखण्यासाठी वचनबद्ध आहे.

Web Title: us sanctions 398 companies from 15 countries that help russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.