Join us  

US Visa : अमेरिकेला फिरायला जाण्याच्या विचार करताय? व्हिसासाठी १००० दिवसांचं वेटिंग; परराष्ट्र मंत्रालयही चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 5:56 PM

जर तुम्हाला अमेरिकेत जायचे असेल किंवा कामानिमित्त जायचे असेल तर व्हिसा मिळण्यासाठी तुम्हाला 1000 दिवस लागू शकतात.

जर तुम्हाला अमेरिकेत जाण्यासाठी  वहिसाची गरज असेल, तर सध्या भारतीयांना 1000 दिवस (Waiting Period for US Visa) प्रतीक्षा करावी लागत आहे. मग तुम्हाला फिरायला जायचे असेल किंवा कोणत्याही कामासाठी जायचे असेल व्हिसासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पाहावी लागेल. हा प्रतीक्षा कालावधी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांसाठी वेगळा आहे. एकीकडे परराष्ट्र मंत्रालय (External Affairs Ministry on US Visa Waiting Period) याबद्दल चिंतेत आहे, तर दुसरीकडे त्यांनी एक मोठी गोष्टही सांगितली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी हा मुद्दा अद्याप अमेरिकेसमोर मांडलेला नाही. परंतु यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. कारण व्हिसा सिस्टम अशी असली पाहिजे, ज्या ठिकाणी कमी वेळ लागेल आणि कमीतकमी आपल्याला व्हिसा कधीपर्यंत मिळेल याची लोकांना माहिती असेल.

व्हिसा टाईम कमी करणार?ईटीच्या वृत्तानुसार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी लोकांना कुठे जायचं असेल तर व्हिसा सिस्टम सोपी असली पाहिजे असे मत व्यक्त केलेल. आम्हाला हेच हवंय आणि आमची ती अपेक्षा आहे. ही गोष्ट अधिकृतरित्या अमेरिकेकडून सांगण्यात आलेली नाही, जेणेकरून कोणी आमच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं. परंतु भारतातील दुतावासानं यावर पावलं उचलण्याचं आणि इतका वेळ लागणार नाही याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेत व्यवसायासाठी जाणाऱ्यांना बी १ आणि पर्यटकांना बी २ व्हिसा जारी केला जातो. या दोन्ही प्रकारांच्या व्हिसासाठी ३ वर्षांपर्यंत वेटिंग पीरिअड आहे.

टॅग्स :अमेरिकाभारतपासपोर्ट