Join us  

वापरा किती वापरायचा तेवढा! BSNL चा असा प्लॅन, जिओ-एअरटेलपेक्षाही दुप्पट डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 2:16 PM

अनेकांकडे आज दोन सिमकार्ड असतात. एक कार्ड असे असते जे बॅकअप असते. दुसरे हे कॉलिंग, डेटा आणि अन्य गोष्टींसाठी वापरले जाते.

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने काही दिवसांपूर्वीच विविध प्लॅन्समध्ये वाढ केली होती. काही प्लॅन असेही आहेत, जे तीस दिवसांची व्हॅलिडीटी देतात. BSNL चा एक असा प्लॅन आहे, जो जिओ, एअरटेलपेक्षा दुप्पट डेटा देतो. तिन्ही कंपन्यांचे २९९ रुपयांचे प्लॅन आहेत. परंतू ते वेगवेगळे फायदे देतात. 

अनेकांकडे आज दोन सिमकार्ड असतात. एक कार्ड असे असते जे बॅकअप असते. दुसरे हे कॉलिंग, डेटा आणि अन्य गोष्टींसाठी वापरले जाते. जे बॅकअप असते ते बहुतांश बीएसएनएल असते. अनेकदा अन्य कंपन्यांच्या कार्डना रेंज नसली की बीएसएनएलचेच कार्ड कामी येते. एवढ्यावरच न राहता तुम्ही हा प्लॅन पाहिला तर पुन्हा बीएसएनएलला दुसरे कार्ड म्हणून वापरणार नाही.

काय आहे प्लॅन... बीएसएनएलच्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३० दिवसांती वैधता मिळते. दररोज तीन जीबी डेटा दिला जातो. एकूण या प्लॅनमध्ये महिन्याला ९० जीबी डेटा दिला जातो. डेली लिमिट जसे संपते तसे इंटरनेट स्पीड ८० केबीपीएस होतो. या शिवाय प्रत्येक नेटवर्कवर कॉलिंगही करता येते. दररोज १०० एसएमएस मोफत दिले जातात. 

एअरटेल आणि जिओ एवढ्याच किंमतीच्या प्लॅनमध्ये काय काय देतात? कधी केलेय का कम्पेअर? एअरटेल दर दिवशी १.५ जीबी डेटा देते. हा डेटा संपला की 64Kbps चा स्पीड. रिलायन्स जिओ २९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये युजरला दररोज दोन जीबीचा डेटा देते. म्हणजेच महिन्याला हा डेटा ५६ जीबी होतो. या दोन्ही कंपन्यांच्या या प्लॅन्सची व्ह्रॅलिडीटी २८ दिवस असते. हा डेटा संपला की त्याचा स्पीड 64Kbps होतो. 

टॅग्स :बीएसएनएल