Lokmat Money > बिझनेस न्यूज > डेबिट-क्रेडिट कार्ड वापरा जपून! देशातील ३९ टक्के कुटुंबांना बसला आर्थिक गंडा

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरा जपून! देशातील ३९ टक्के कुटुंबांना बसला आर्थिक गंडा

पैसेही माघारी मिळेनात, १०% जणांनी एटीएम कार्डद्वारे फसवणूक, इतर १०% जणांनी बँक खाते फसवणूक तर १६ टक्के जणांनी इतर मार्गाने फसवणूक झाल्याचे सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 10:19 AM2023-05-04T10:19:23+5:302023-05-04T10:19:55+5:30

पैसेही माघारी मिळेनात, १०% जणांनी एटीएम कार्डद्वारे फसवणूक, इतर १०% जणांनी बँक खाते फसवणूक तर १६ टक्के जणांनी इतर मार्गाने फसवणूक झाल्याचे सांगितले.

Use Debit-Credit Cards Carefully! 39 percent of the families in the country are in financial trouble | डेबिट-क्रेडिट कार्ड वापरा जपून! देशातील ३९ टक्के कुटुंबांना बसला आर्थिक गंडा

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरा जपून! देशातील ३९ टक्के कुटुंबांना बसला आर्थिक गंडा

मुंबई - देशात गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन आणि कॅशलेस पैसे पाठवण्याची सुविधा आल्याचा फायदा होत असला तरीही आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने फटकाही बसू लागला आहे. देशातील ३९% कुटुंबांची गेल्या तीन वर्षांत आर्थिक फसवणूक झाली असून, त्यातील केवळ २४% कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले असल्याचे अहवालात समोर आले आहे.

सर्वाधिक फटका कुणाला? 
सर्वाधिक आर्थिक फसवणूक ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करण्यात आली आहे. २३% जणांना याचा फटका बसला आहे.  १३% लोकांची खरेदी-विक्री आणि इतर साइटद्वारे फसवणूक झाली आहे. १३% संकेतस्थळांनी साहित्य डिलिव्हरीच्या नावाखाली ऑनलाइन पैसे घेतले; पण वस्तू डिलिव्हरी केले नाही. १०% जणांनी एटीएम कार्डद्वारे फसवणूक, इतर १०% जणांनी बँक खाते फसवणूक तर १६ टक्के जणांनी इतर मार्गाने फसवणूक झाल्याचे सांगितले.

फसवणुकीत किती वाढ? 
गेल्या वर्षाच्या तुलनेत फसवणुकीची तक्रार करणाऱ्यांची टक्केवारी २०२२ (मागील ३ वर्षे) च्या तुलनेत २०२३मध्ये किंचित कमी झाली.
त्याच वेळी, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे फसवणुकीची तक्रार करणाऱ्या लोकांची टक्केवारी गेल्या वर्षीच्या १८% वरून २३%वर पोहोचली आहे.

Web Title: Use Debit-Credit Cards Carefully! 39 percent of the families in the country are in financial trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.