Join us

तपास करताना अधिकारांचा वापर नि:पक्षपातीपणे करा - अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 2:40 AM

तपास करताना महसूल गुप्तचर अधिका-यांनी आपल्या अधिकारांचा वापर नि:पक्षपातीपणे, तसेच योग्य कार्यकारणभावासह करावा, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करावा, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.

नवी दिल्ली : तपास करताना महसूल गुप्तचर अधिका-यांनी आपल्या अधिकारांचा वापर नि:पक्षपातीपणे, तसेच योग्य कार्यकारणभावासह करावा, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करावा, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीआरआय) ६0 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. जेटली म्हणाले की, महसूल अधिकाºयांना देण्यात आलेले अधिकार फार व्यापक आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करताना अधिकाºयांनी विवेक जागृत ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही कारवाई नि:पक्ष, योग्य कार्यकारणभाव असलेली, तसेच फलदायी स्वरूपाची असायला हवी.खटल्यांचे यशाचे प्रमाण, तसेच दंडाचे प्रमाण उच्च दर्जाचे राहिले, तरच गुन्हेगारांना जरब बसेल. आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप प्रत्येक पिढीगणिक बदलत आहे. गुन्हेगार आता तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारांना आपल्या कारवाया करणे अधिक सोपे झाले आहे. याचा मुकाबला करण्यासाठी अधिकाºयांनीही तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. आर्थिक गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यकच आहे, असे त्यांनी नमूद केले.वित्त सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले की, सध्या डीआरआय फक्त ६00 अधिकाºयांसह काम करीत आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या तुलनेत ही संख्या फक्त एक दशांश आहे.जेटली म्हणाले की, सध्याच्या काळात पैशाची हेराफेरी इतकी जलदगतीने होते की, डीआरआयसारख्या छोट्या संस्थांनी आपल्या कौशल्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. कोणतीही तपास संस्था जेव्हा एखादा गुन्हा उघडकीस आणते, तेव्हा खूप मोठ-मोठे दावे केले जातात. तथापि, ही प्रकरणे जेव्हा न्यायालयासमोर जातात, तेव्हा हे दावे पोकळ ठरतात. न्यायालयासमोर ते टिकत नाहीत. त्यातून खटले अपयशी ठरतात. गुन्हेगारांना पायबंद घालायचा असेल, तर गुन्हेगारांना शासन होण्याचे प्रमाण वाढायला हवे.

टॅग्स :अरूण जेटली