न्यूयाॅर्क : गेल्या काही महिन्यांमध्ये टेक क्षेत्र कर्मचारी कपातीमुळे हादरले आहे. या क्षेत्रासमाेर एक नवे आव्हान निर्माण झाले आहे, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’चे. हे एआय मनुष्यबळाची जागा तर घेतच आहे, साेबतच कर्मचारी कपातीसाठीदेखील त्याचा वापर केला जात आहे.
मंदीची शक्यता आणि घटलेला नफा या कारणांमुळे टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यात येत आहे. त्यासाठी एआयची मदत घेऊन नाेकरीवरून काढण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेमध्ये सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे. एका महिन्यातील कपातीचा हा दुसरा सर्वात माेठा आकडा आहे. टेक रिसर्च फर्म गार्टनरची शाखा असलेल्या कॅप्टेराने यासंदर्भात अहवाल तयार केला आहे.
सर्वेक्षणाद्वारे दिली कबुली -खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचे धाेरण राबविण्यात येते. त्यासाठी एखादे साॅफ्टवेअर आणि अल्गाेरिदमचा वापर करण्यात येईल, असे ९८ टक्के एचआर प्रमुखांनी एका सर्वेक्षणात सांगितले.
ई-वाहन क्षेत्र देणार ५ काेटी राेजगार -देशात ई-वाहनांची विक्री सातत्याने वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार देशात २०३०पर्यंत ई-वाहनांची संख्या एक काेटीपेक्षा अधिक हाेणार आहे. त्याचसाेबत या क्षेत्रातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे ५ काेटींहून अधिक राेजगार निर्मिती हाेण्याची अपेक्षा आहे. हे क्षेत्र नाेकरी देणारे एक प्रमुख स्राेत बनेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
ई-वाहनांची वाढती संख्या पाहता या क्षेत्रात एक माेठी इकाेसिस्टीम विकसित हाेणार आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळाचीही गरज भासणार आहे. त्यातून माेठ्या प्रमाणावर राेजगार निर्मितीही हाेईल.
अल्गाेरिदमने केले ट्रॅक अन् काढले कामावरून -दाेन वर्षांपूर्वी ॲमेझाॅनने त्यांच्या फ्लेक्स डिलिव्हरी वाहनाला ट्रॅक केले हाेते. त्या अल्गाेरिदमनुसार काही चालक निर्धारित केलेले लक्ष्य पूर्ण करू शकत नव्हते. या चालकांना ऑटाेमेटेड ई-मेलच्या माध्यमातून कामावरून काढण्यात आले.
या क्षेत्रात हाेईल राेजगार निर्मिती- साॅफ्टवेअर डेव्हलपमेंट- रिसर्च केमिकल - मटेरियल अभियंते- मेंटेनन्स मेकॅनिक- तंत्रज्ञ- इलेक्ट्रिशियन- पाॅवर लाइन इन्स्टाॅलर
एआयद्वारे घेतला जाताे उत्पादकतेचा आढावाकार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेचा स्काेअर ट्रॅक करता येताे. कर्मचाऱ्यांच्या की-बाेर्डवरील प्रत्येक हालचाल ट्रॅक करणे शक्य झाले आहे. एआयचा वापर करून कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेचा आढावा घेऊन कपातीसाठी यादी तयार हाेते.
- १०,००,००० ई-वाहनांची २०२२ मध्ये विक्री झाली.- २०३०पर्यंत ई- वाहनांचा वाटा ३०% हाेणार