ताजमहल चहाला 'वाह ताज' नावाने ओळख देणारे झाकीर हुसेन आता या जगात नाहीत. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतातील एक प्रिमियम चहा ब्रँड, ज्याचा मालकी हक्क एक ब्रिटिश कंपनीकडे आहे. तो देशभर वाह ताज नावाने प्रसिद्ध झाला. ही अनोखी जाहिरात लोकांमध्ये चर्चेत आणणारे जागतिक दर्जाचे भारतातील तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन होते. तुम्हीही ताजमहल चहाची ही जाहिरात नक्कीच पाहिली असेल ज्यात झाकीर हुसेन तबला वाजवत ताजमहल चहा पितात आणि त्याचा 'वाह ताज' असा उल्लेख करतात.
ताजमहल चहाला 'वाह ताज' ही नवी ओळख झाकीर हुसेन यांच्यामुळे मिळाली. ही जाहिरात जेव्हा रिलीज झाली तेव्हा घरोघरी ताजमहल चहाला ओळख मिळाली. ताजमहल चहा त्यावेळी नुकताच लॉन्च झालेला ब्रँड होता. ब्रुक ब्रॉन्ड ताजमहल चहाची सुरुवात १९९६ साली कोलकाता येथे झाली. हा एक प्रिमियम टी ब्रँड आहे जी हाय क्वालिटी चहापत्तीसाठी प्रसिद्ध आहे. सुरुवातीला ताजमहल चहाची जाहिरात 'आह ताज'च्या आधारित होती आणि तेव्हा झाकीर हुसेन यांची एन्ट्री झाली नव्हती.
ताजमहल चहाला वेस्टर्न ब्रँडच्या नजरेने पाहिले जात होते. त्यासाठी कंपनीला भारतीय ग्राहकांना विशेषत: देशातील सामान्य मध्यमवर्गीय लोकांना आकर्षिक करायचं होते. ताजमहल चहा रिलॉन्च करायची वेळ आली तेव्हा जाहिरातदार कंपनीला अशा चेहऱ्याची गरज होती जो या टी ब्रँडचा चेहरा बनेल. रंग, सुगंध आणि चव हे तीन पॅरामीटर्स होते ज्यावर ताजमहाल चहाची जाहिरात बनवायची होती. जाहिरातीचा चेहरा म्हणून उस्ताद झाकीर हुसेन यांची निवड करण्यात आली.
जाहिरातीसाठी कशी झाली निवड?
ताजमहल चहाच्या जाहिरातीसाठी झाकीर हुसेन यांची निवड ३ कारणाने परफेक्ट होती. झाकीर हुसेन केवळ भारतातील प्रसिद्ध तबलावादक नव्हते तर ते अमेरिकेतही राहायचे. त्यांची पर्सनॅलिटी वेगळी होती. ताजमहल चहाची जाहिरात करण्यासाठी ते आग्रा येथे आले होते. जाहिरात शूट करताना ताजमहल बॅकग्राऊंडला दाखवायचे होते. जेव्हा झाकीर हुसेन यांनी गरमागरम चहाचा एक घोट घेतला, तेव्हा त्यांच्या तबल्यावरील थाप ऐकून त्यांचे कौतुक करताना वाह उस्ताद वाह...असं बोलले जाते तेव्हा झाकीर हुसेन म्हणतात, 'अरे हुजूर वाह ताज बोलिए...' झाकीर हुसेन यांच्यासोबत अन्य तबलावादक आदित्य कल्याणपूर हे जाहिरातीत दिसून येतात.
या जाहिरातीत झाकीर हुसेन आणि त्यांच्या तबल्याचं नातं ठळकपणे पाहायला मिळते. बहुतांश भारतीयांनी या जाहिरातीतून झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा आस्वाद घेतला. झाकीर हुसेन यांच्या ताजमहल चहाच्या जाहिरातीला मोठं यश मिळालं. भारतीय बाजारपेठेत ताजमहल चहाची विक्री वाढली. ब्रुक बॉन्ड ताजमहल चहा हा हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड कंपनीचं उत्पादन आहे. ही ब्रिटीश कंपनी यूनिलीवरची सबकंपनी आहे. या कंपनीने तबला जादूगारसोबत दिर्घकाळ पार्टनरशिप केली. त्यानंतर HUL ने प्रसिद्ध सतार वादक पंडित नीलाद्री कुमार आणि संतूर वादक पंडित राहुल शर्मा यांच्यासोबत टीव्ही जाहिराती केल्या.