नवी दिल्ली : एप्रिल ते आॅगस्टपर्यंत राष्टÑीय रोजगार हमी योजनेत (एनआरईजीए) १.६ कोटी नवीन मजूर सामील झाले. या योजनेत सहभागी झालेल्या कुटुंबांची संख्या १४.३६ कोटींवर पोहोचली असून, ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये नवीन रोजगार पत्राच्या (जॉब कार्ड) संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोविड-१९ च्या उद्रेकामुळे स्थलांतरित मजूर, कामगार आपापल्या गावाकडे परतल्याने महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतहत नोंदणी करणाऱ्या मजुरांची संख्या वाढत आहे.या योजनेत अकुशल कामगारांची संख्याही सातत्याने वाढत असून कोविड-१९ च्या साथीमुळे यात अभूतपूर्व वाढ झाली आहे. सरकारच्या अंदाजानुसार बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांतील ११६ जिल्ह्यांत केंद्र सरकारने गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केल्याने ६७ लाख स्थलांतरित मजूर या जिल्ह्यांत परतले आहेत.पश्चिम बंगालमध्ये परतलेले २० लाख स्थलांतरित मजूर मात्र गरीब कल्याण रोजगार अभियानात नाहीत. पश्चिम बंगालमध्ये ६.८ लाख नवीन जॉब कार्ड जारी करण्यात आहेत. उत्तर प्रदेशात ही संख्या २१ लाख, तर बिहारमध्ये ११ लाख आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार या अभियानातहत काम करणाºया कुटुुंबांच्या संख्येनुसार देशातील पाच जिल्हे अग्रणी आहेत. यापैकी पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान, हुगळी, पश्चिम मेदिनापूर, २४ दक्षिण परगणा आणि विल्लूपरम हे चार जिल्हे आहेत.जूनमध्ये १ कोटीहून अधिक मजुरांची भर६९० जिल्ह्यांतील आकडेवारीनुसार दहा अग्रणी जिल्ह्यांत रोजगार हमी योजनेतहत जूनमध्ये एक कोटींहून अधिक कुटुंबांची भर पडली. या अग्रणी दहा जिल्ह्यांत राजस्थानमधील भिलवाडा आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हा वगळता इतर सर्व जिल्हे पश्चिम बंगालमधील आहेत.
उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगालमध्ये नवीन जॉब कार्डधारकांची मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 1:51 AM