लखनौ : दुसऱ्या पायाभरणी समारंभात समाविष्ट असलेल्या औद्योगिक प्रकल्पांमुळे उत्तर प्रदेश हे एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था असलेले देशातील पहिले राज्य बनेल, असे प्रतिपादन फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कल्याण कृष्णमूर्ती यांनी रविवारी केले. गेल्या वर्षी झालेल्या ‘उत्तर प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदे’त मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करारांवर स्वाक्षºया करण्यात आल्या होत्या. त्यातील ६५ हजार कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ रविवारी येथे पार पडला. हा राज्यातील अशा प्रकारचा दुसरा पायाभरणी समारंभ होता. पहिला पायाभरणी समारंभ गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता. पहिल्या टप्प्यात ६० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प समाविष्ट होते.
कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, हा पायाभरणी समारंभ उत्तर प्रदेशला देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य, तसेच नव्या संकल्पनांचे भांडार बनविण्यात साह्यभूत ठरेल. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची दूरदृष्टी आणि सक्षम पुढाकार यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. व्यवसाय सुलभतेत आणखी सुधारणा होणेही अपेक्षित आहे. कृष्णमूर्ती यांनी म्हटले की, फ्लिपकार्टसाठी उत्तर प्रदेश हे एक महत्त्वाचे राज्य आहे. राज्यात आमचे अनेक विक्रेते आणि एमएसएमई उत्पादक आहेत. त्याचबरोबर स्थानिक हस्तकारागिरांनाही त्यांच्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी आम्ही प्रोत्साहित करीत आहोत. हजारो कारागीर, छोटे व्यावसायिक आणि महिला उद्यमी फ्लिपकार्टसोबत भागीदारी करीत आहेत. त्यांना संपूर्ण देशाची बाजारपेठ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.कृष्णमूर्ती यांनी म्हटले की, लक्षावधी लोकांच्या जीवनात बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न असून, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. मायंत्रा फॅशन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राज्यांच्या सीमांची बंधने तोडून कारागीर व विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग उत्तर प्रदेशातून : शहाच्देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची करण्याचे लक्ष्य गाठण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी येथे म्हणाले. या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्तर प्रदेश स्वत:चा वाटा एक ट्रिलियन उचलेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.च्‘मी हे ऐकले होते की, देशाचे पंतप्रधान बनण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, तसेच भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचा मार्गही राज्यातून जातो’, असे अमित शहा यांनी म्हटले. च्मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात भाषणात उत्तर प्रदेशमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे सामर्थ्य असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, हे लक्ष्य मोठे असले तरी राज्यात आवश्यक तेवढी संसाधने आणि मनुष्यबळ असल्यामुळे ते गाठणे अशक्य नाही.65 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या औद्योगिक प्रकल्पांच्या दुसºया भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी येत्या पाच वर्षांत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताला स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याचे शहा यांनी सांगितले. पाच ट्रिलियन डॉलर्सच्या लक्ष्यामागे हा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक व्यावसायिक, उद्योजक यावेळी उपस्थित होते.च्गेल्या वर्षी पहिले भूमिपूजन झाले होते त्याचप्रमाणे यावेळीही राज्यात गुंतवणूक आणण्याचा उद्देश आहे. शहा यांच्या हस्ते ६५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या २५० प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ झाला.