Lokmat Money > बिझनेस न्यूज > Coronavirus: योगी सरकारच्या महसुलात ७४ टक्के वाढ; दारू विक्रीतून कमावले तब्बल ३० हजार कोटी!

Coronavirus: योगी सरकारच्या महसुलात ७४ टक्के वाढ; दारू विक्रीतून कमावले तब्बल ३० हजार कोटी!

Coronavirus: दारूच्या विक्रीतून उत्तर प्रदेशला तब्बल ३० हजार कोटींचा महसूल मिळाल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:16 PM2021-07-16T17:16:47+5:302021-07-16T17:22:26+5:30

Coronavirus: दारूच्या विक्रीतून उत्तर प्रदेशला तब्बल ३० हजार कोटींचा महसूल मिळाल्याचे सांगितले जात आहे.

uttar pradesh yogi govt sees 74 percent jump in liquor revenue earnings | Coronavirus: योगी सरकारच्या महसुलात ७४ टक्के वाढ; दारू विक्रीतून कमावले तब्बल ३० हजार कोटी!

Coronavirus: योगी सरकारच्या महसुलात ७४ टक्के वाढ; दारू विक्रीतून कमावले तब्बल ३० हजार कोटी!

Highlightsयूपीमधील दारूच्या उत्पन्नात ७४ टक्के वाढयोगी सरकारचे २ हजार ७६ नवीन दारू दुकानांना परवानेउत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाची माहिती

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊन आणि अन्य गोष्टींमुळे देशासह अनेक राज्यांतील महसुलात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्राकडूनही अनेक राज्यांना जीएसटीचा परतावा मिळाला नसल्यामुळे राज्यांचीही आर्थिक कोंडी होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने कोरोना संकटाच्या काळातही महसुलातून मोठी कमाई केल्याचे समोर आले आहे. तर, दारूच्या विक्रीतून उत्तर प्रदेशला तब्बल ३० हजार कोटींचा महसूल मिळाल्याचे सांगितले जात आहे. (uttar pradesh yogi govt sees 74 percent jump in liquor revenue earnings)

कोरोनाचा कहर अद्यापही शमलेला दिसत नाही. दुसरी लाट ओसरली नसून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. त्यामुळे अर्थचक्र मंदावले आहे. दुसरीकडे, २०२०-२१ या आर्थिक वर्षात उत्तर प्रदेश सरकारने दारुच्या दुकानांवर लावलेल्या परवाना शुल्क आणि अबकारी करातून एकूण ३०,०६१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या आरटीआय अर्जाद्वारे सदर माहिती मिळाली आहे.

TATA ग्रुपमध्ये पार्टनर होण्याची उत्तम संधी! केवळ १० हजार गुंतवा आणि मोठी कमाई करा

दारूच्या उत्पन्नात ७४ टक्के वाढ

गेल्या चार वर्षांत यूपीमधील दारूच्या उत्पन्नात ७४ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे दारुपासून मिळणारा महसूल १७३२० कोटी रुपयांवरून ३००६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दारुच्या प्रत्येक दुकानातून राज्य सरकारला दरवर्षी १.१० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीत योगी सरकारने २ हजार ७६ नवीन दारू दुकानांना परवाना दिला आहे. 

TATA, Reliance आता विसरा; ‘या’ कंपनीतील १५३ कर्मचारी घेतात १ कोटी पगार!

५०० नव्या दुकानांना परवाना

यापूर्वी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील सरकारने पाच वर्षांच्या कालावधीत २ हजार ४६६ नव्या दुकानांना परवाना देण्यात आला होता. त्यावेळी राज्य सरकारचा महसूल २२ हजार ३७७ कोटी रुपयांवरून २४ हजार ९४३ कोटी रुपयांवर पोहोचला होता. त्यात ११.५ टक्के इतकी वाढ त्यावेळी नोंदवली गेली होती. योगी आणि अखिलेश सरकारच्या कार्यकाळात दरवर्षी ५०० नव्या दुकानांना परवाने देण्यात आले. गेल्या १५ वर्षांत यूपी सरकारच्या मद्यापासून मिळणाऱ्या महसूलात ८ हजार १३९ कोटी रुपयांपासून वाढ होऊन तो ३००६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
 

Web Title: uttar pradesh yogi govt sees 74 percent jump in liquor revenue earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.