Join us

आणखी एक सिमेंट कंपनी विकली जाणार, अदानींसह 3 दिग्गज बोली लावणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 4:03 PM

ABG Shipyard Group Company: या कंपनीवर विविध बँकांचे सात हजार कोटींचे कर्ज आहे.

Vadraj Cement Insolvency Process: देशातील एक मोठी सिमेंट कंपनी लवकरच विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. एबीजी शिपयार्ड ग्रुपची वदराज सिमेंट कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत विकली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या संभाव्य खरेदीदारांमध्ये अदानी ग्रुप, JSW सिमेंट आणि आर्सेलर मित्तल ग्रुप यांचा समावेश आहे. कंपनी विकत घेण्यासाठी या तीन दिग्गजांमध्ये बोली होऊ शकते.

IBC मध्ये हस्तांतरित करण्यास सहमती मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2018 मध्ये ट्रेड बूमर टेक्नॉलॉजी इंडियाची थकबाकी भरण्यासाठी वदराज सिमेंट बंद करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी दावा केला आहे की, न्यायालय कंपनीच्या मालमत्ता विकण्याच्या प्रक्रियेवर निराश आहे. आता कोर्टाने सिमेंट कंपनीची कर्ज रिझोल्यूशन प्रक्रिया आयबीसीकडे हस्तांतरित करण्याचे मान्य केले आहे.

अंतरिम व्यावसायिक नेमण्यास सांगितलेET मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, एका बँकेच्या याचिकेच्या आधारे उच्च न्यायालयाने 4 सप्टेंबर रोजीच्या आपल्या आदेशात NCLT कडे कार्यवाही समाप्त करण्यास मान्यता दिली आहे. वदराजच्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी कर्जदाराने EY चे पुलकित गुप्ता, यांना दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अंतरिम व्यावसायिक म्हणून नियुक्त करण्यास सांगितले आहे. या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

JSW सिमेंट आणि आर्सेलर मित्तल यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अदानी समूहाने ईटीच्या मेलला प्रतिसाद दिलेला नाही. खरेदीदारांकडून 2,000 कोटी ते 2,500 कोटी रुपये देऊ केले जातील, अशी अपेक्षा आहे. कंपनीवर 7,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, यूको बँक आणि येस बँक या कंपनीला कर्ज देणारे आहेत.

टॅग्स :व्यवसायअदानीजिंदाल कंपनीगुंतवणूकगौतम अदानी