Join us

व्हॉट्सअॅप नवं फीचर आणण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 12:49 PM

फेसबुकने टेकओव्हर केलेलं व्हॉट्सअॅप लवकरच युजर्ससाठी नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्दे फेसबुकने टेकओव्हर केलेलं व्हॉट्सअॅप लवकरच युजर्ससाठी नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून आणखी एका नव्या फीचरची चाचणी घेतली जाते आहे.या फीचरद्वारे व्हॉट्सअॅप युजर्स व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल असे दोन्ही पर्यात एकाच कॉलमध्ये आलटून पालटून वापरता येणार आहेत.

मुंबई, दि. 27- फेसबुकने टेकओव्हर केलेलं व्हॉट्सअॅप लवकरच युजर्ससाठी नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. याआधी युजर्सची संख्या वाढविण्यासाठी तसंच ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपने नवे फीचर्स आणले आहेत. पण आता आणखी एक नवं फिचर आणण्याची तयारी व्हॉट्सअॅप करतं आहे. आता कंपनीकडून आणखी एका नव्या फीचरची चाचणी घेतली जाते आहे. लवकरच या फीचरद्वारे व्हॉट्सअॅप युजर्स व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल असे दोन्ही पर्यात एकाच कॉलमध्ये आलटून पालटून वापरता येणार आहेत. याशिवाय कंपनी बिझनेससाठी आणखी एक अॅप बनवण्याच्या तयारीत असल्याचाही माहिती समोर येते आहे.

ट्विटरवरील @wabetainfo या अकाउंटवरील ट्विटनुसार, व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइडवर एका नव्या फीचरची चाचणी घेतं आहे. व्हॉट्सअॅप बीटा बिल्डसमध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवण्याचं काम @wabetainfo हे टि्वटर अकाउंट करत असतं. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरद्वारे चालू असलेला फोन डिस्कनेक्ट न करता व्हॉइस कॉलमधून व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉलमधून व्हॉइस कॉलवर स्वीच करता येणार आहे. सध्या असलेल्या फीचरमध्ये व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल एकाच वेळी एकाच कॉलमधून करता येत नाहीत. त्यासाठी व्हॉइस कॉल कट करून व्हिडीओ कॉल करावा लागतो किंवा त्या उलट करावं लागतं. पण नव्या फीचरमध्ये दोन्ही कॉल एकत्र करणं शक्य असेल. व्हॉट्सअॅपकडून लहान आणि मध्यम बिझनेससाठी एक नवं अॅप बनवलं जाणार आहे, असंही  @wabetainfo ने म्हंटलं आहे.  हे अॅप अॅन्डॉइड, IOS आणि विंडोज १० मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून व्यापारी आणि ग्राहकांना एकमेकांशी संवाद साधणं शक्य होणार आहे. 

व्हॉट्सअॅपचं जबरदस्त 'नाईट मोड'  फीचररात्रीच्या वेळी उत्तम फोटोसाठी व्हॉट्सअॅपने नाईट मोड फीचर आणणार आहे. हे नवं फीचर आधी आयओएसमध्ये येईल.अँड्रॉईड युझरना या फीचरसाठी थोडी वाट पाहावी लागेल. हे फीचर किती दिवसात युझरसाठी उपलब्ध होईल, याबाब अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या फीचरद्वारे कमी प्रकाशातही युझर चांगेल फोटो क्लिक करु शकतील. या नव्या अपडेटसह व्हॉट्सअॅपच्या कॅमेरा UIमध्ये नवं बटण अॅड होईल. या बटण किंवा फीचरमध्ये कमी प्रकाशात काढलेल्या फोटोंची क्वालिटी आणखी चांगली करण्याची क्षमता असेल. व्हॉट्सअॅपचं इन-अॅप कॅमेरा ओपन केल्यास उजव्या बाजुला एक चंद्रासारखा आयकॉन दिसेल, जो फ्लॅश आयकॉनला अगदी लागून असणार आहे. नाइट मोड सुरू करण्यासाठी या आयकॉनला टॅप करावं लागेल.