मुंबई : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आज ७२.६९ रुपये इतके असले तरी ते ८० रुपयांवर जाणार असल्याचे महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने गृहीत धरले आहे. रुपया आणखी घसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत हेलिकॉप्टर खरेदीबाबतचे शुद्धिपत्रक विभागाने काढले आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय ८ मे २०१८ रोजी शासनाने घेतला होता. तेव्हा डॉलरच्या तुलनेत ७२.६९ रुपये असे मूल्य होते. अमेरिकेतील सिर्कोस्की इंटरनॅशनल आॅपरेशन या कंपनीकडून १२७ कोटी ११ लाख रुपयांत हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येईल, असे शासन निर्णयात म्हटले होते. मात्र, आता रुपया घसरल्याने हेच हेलिकॉप्टर १४५ कोटी २७ लाख रुपयांना खरेदी करावे लागेल. याचा अर्थ रुपया घसरल्याने राज्य सरकारला १८.१६ कोटी रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
प्रचलित दरानुसारच बिल
शुद्धीपत्रकात प्रचलित परकीय चलन दरानुसारच बिल अदा करावे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
त्यामुळे आता ८० रूपयांप्रमाणे देयक अदा केले जाणार, असा समज
असण्याचे काहीच कारण नाही, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट
केले आहे.
डॉलरचे मूल्य ८० रुपयांवर जाणार, सरकारचा अंदाज
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आज ७२.६९ रुपये इतके असले तरी ते ८० रुपयांवर जाणार असल्याचे महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने गृहीत धरले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 04:55 AM2018-09-12T04:55:06+5:302018-09-12T04:55:16+5:30